लहू बालवडकर व सतीश पाटील यांच्या पुढाकाराने स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या यशवंतांचा सत्कार !!

0

बालेवाडी :

MPSC व UPSC या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या जवळपास 30 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ बालेवाडी येथे पाटील वस्ती येथील रणभूमी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडला.

लहू बालवाडकर व सतीश पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभास SPACE अकॅडमीच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशासनात नवीन येणाऱ्या तसेच प्रशासनात कार्यरत असलेल्या एकूण 70 पेक्ष्या जास्त अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

यामध्ये पिंपरी चिंचवड मनपा चे आयुक्त राजेश पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, IFS राहुल पाटील, Joint रेजिस्ट्रार मिलिंद आक्रे, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी एस वानखडे या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाची माहिती देताना लहू बालवडकर सोशल वेलफेअर चे अध्यक्ष लहू बालवडकर यांनी मॅकन्यूज ला माहिती देताना सांगितले की, आपल्या बुध्दी कौशल्याच्या जोरावर स्पर्धा परीक्षा मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान झाला. भविष्यात चांगल्या प्रकारे प्रशासकीय सेवेत काम करून एक आदर्श घडविण्याच्या दृष्टीने त्यांना मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. तसेच परिसरातील तरुणांना, या नवोदित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाहून स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याकरिता प्रेरणा मिळावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सर्व प्रमुख वक्त्यांनी प्रशासनात येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांना स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्याविषयी कानमंत्र देऊन सर्व नवीन अधिकाऱ्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला पोलीस, रेवेन्यू, वन, मंत्रालय, आयकर इ. विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन सामाजिक कार्यकर्त्या योगिता म्हस्के यांनी तर आभार प्रदर्शन अखिलेश खिस्ते यांनी केले.

 

See also  बाणेर नागरी पतसंस्थेतर्फे सिंधुताई सपकाळ यांचा सत्कार.