इंटरव्हल नंतरची पुढची कथा मी सांगेन : संजय राऊत

0

मुंबई :

नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हल नंतरची पुढची कथा मी सांगेन, असा सूचक इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

वसुली गँग कुणाच्या होत्या. मी सांगितलं ना. इंटरव्हलपर्यंतची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे, इंटरव्हलनंतरची कथा स्क्रिनप्ले मी तुम्हाला सांगेन. तसेच या प्रकरणातील तथ्य आणि सत्य धक्कादायक आहे. देशभक्तीचा मुखवटा पांघरून काय होतं त्याची चौकशी झाली पाहिजे, असं राऊत म्हणाले.

याप्रकरणातील साक्षीदाराचा बालही बाका होणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही त्याच्या पाठी आहोत. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत आहेत. या मुलाने मोठं धाडस केलं. त्याने देशावर उपकार केले. मी त्याच्या धाडसाचं कौतुक करतो. हीच खरी देशभक्ती आहे. आता अनेक गोष्टी बाहेर येतील. आता मलिक यांनी काही गोष्टी बाहेर आणल्या. आता इंटरव्हलनंतर बाकीची स्टोरी बाहेर येईल, असं ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. सॅम डिसोजाचा संदर्भ मनी लॉन्ड्रिंगमध्ये येते. बड्या लोकांचे पैसे तो परदेशात पाठवतो. माझी मागणी आहे या प्रकरणाची चौकशी करावी, असंही त्यांनी सांगितलं.

केपी गोसावी, परमबीर सिंग कुठे हे भाजपला माहीत असेल. गोसावीचा घातपात झाला की नाही हे ज्याने शंका उपस्थित केली. तेच सांगू शकतील. किंवा त्यांचे समर्थक पार्टीच सांगेल, असं संजय राऊत म्हणालेत.

See also  एफआरपी चा दर साखरेपेक्षा जास्त ; सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने अडचणीत