बालेवाडी :
लहु बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या वतीने अल्पउत्पन्न धारक नागरिकांसाठी लहु बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात मागील काही दिवसांपासून मोफत लसीकरण महाअभियान सुरु करण्यात आले होते. या अभियानाने 2500 लसीकरणाचा टप्पा नुकताच पार केला.
जगभर पसरलेल्या या कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी व याचा समूळ नायनाट करण्यासाठी बाळासाहेब देवरास पॉलिक्लिनिक, सिरम इन्स्टिटयूट, PPCR, पुणे वैद्यकीय सेवा प्रतिष्ठान, फर्स्ट एड पॉलिक्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने या लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेत मोलाची साथ देणाऱ्या नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी यांचा लहु गजानन बालवडकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
२५०० लसीकरणाचा टप्पा यशस्वीरीत्या पार झाल्यानंतर लहू बालवडकर यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, उस्फूर्तपणे कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी स्वतःच्या शरीराची काळजी घेण्याच्या दृष्टीने या मोफत लसीकरण मोहिमेत सहभागी झालेल्या नागरिकांचे तसेच या लसीकरणासाठी मोलाचे सहकार्य लाभलेले नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे येथील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व आपल्या देशाला, आपल्या शहरला, आपल्या परिसराला कोरोना महामारीमुक्त करावे यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान भाजपा सदस्य व लसीकरण मोहिमेचे आयोजक लहु गजानन बालवडकर यांनी केले.