कृष्णगंगा सोशल फाऊंडेशन च्या वतीने ४८५ नागरिकांचे लसीकरण.

0

पाषाण :

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजून पुर्ण पणे कोरोना संपलेला नाही म्हणुनच कोरोना विरूद्ध लढण्यासाठी लसीकरण करुण घेण्याशिवाय पर्याय नाही. परंतु अल्प उत्पन्न धारक नागरिकांना लसीकरण करून घेणे शक्य होत नाही. त्यांची हि गरज ओळखून रोहन रोहिदास कोकाटे व कृष्णगंगा सोशल फाऊंडेशन वतीने सुसरोड रोहन कोकाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये बाळासाहेब देवरस पाॅलिक्लिनिक, निरामय आरोग्य संस्था व ‘स्व’रूपवर्धिनी आणि सहयोगी संस्थाच्या सहकार्याने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण अभियान राबविले होते.

मोफत लसीकरण मोहीमबाबत माहिती देताना रोहन कोकाटे यांनी सांगितले की, या अभियानात ४८५ नागरिकांनी लस देण्यात आली. नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. लसीकरण झाल्याने अल्प उत्पन्न धारक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सर्व सामान्य नागरीकांना लस उपलब्ध करून देता आली याचे समाधान आहे.

कार्यक्रमाचे उदघाटन समाजभुषण ह.भ.प. शांताराम निम्हण, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाचे अध्यक्ष मारूती कोकाटे, मृदृंग मनी पाडुंरंग दातार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी ह.भ.प. पंढरीनाथ कोकाटे, बबन भेगडे, नितीन कोकाटे, सुरेश कोकाटे, रत्नाकर मानकर, रामदास आमले, कैलास कोकाटे, ज्ञानेश्वर भेगडे, नामदेव भेगडे, गोविंद कोकाटे, कालिदास कोकाटे, नारायण कोकाटे, उपाध्यक्ष भाजपा राहुल कोकाटे, स्विकृत सचिन पाषाणकर, भास्कर कोकाटे, शिवाजी कोकाटे, मिलिंद कोकाटे, संदीप कोकाटे, उत्तम जाधव, शरद कोकाटे,पांडुरंग कोकाटे, सौरभ कोकाटे, स्वप्निल कोकाटे, चैतन्य तिवारी, संग्राम कोकाटे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यात कृष्णगंगा सोशल फाऊंडेशन चे सर्व सहकारी सचिन ववले, प्रज्योत कोकाटे, शिरीष कोकाटे, विनायक कोकाटे, प्रथमेश कोकाटे, किरण कोकाटे, प्रतिक कोकाटे, कुणाल कोकाटे, योगेश कोकाटे, ओंकार कोकाटे, प्रसाद गायकवाड, ऋतिक कोकाटे, कौस्तुक कोकाटे, ओम कोकाटे, सार्थक कोकाटे, उपेंद्र कोकाटे या सर्वांचे सहकार्य लाभले.

See also  सुतारवाडी पाषाण शिवसेनेच्या वतीने साफसफाई कर्मचाऱ्यांचा वृक्ष रोपटे देवून सन्मान