बालेवाडी वुमन्स क्लब च्या वतीने विविध वस्तूंचे प्रदर्शन.

0

बालेवाडी :

एसकेपी कॅम्पस बालेवाडी येथे बालेवाडी वुमन्स क्लब च्या वतीने १० ऑक्टोंबर रोजी महिलांसाठी विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आणि लहान मुलांसाठी फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. महिला उद्योजकांना ना नफा ना तोटा या तत्वावर कमीत कमी दरामध्ये विविध वस्तूं खरेदीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या.

लहान मुलांसाठी खास फॅशन शोचे आयोजन या वेळी केले होते. अतिशय सुंदर असे व्यासपीठ लहान मुलांसाठी उपलब्ध करून दिले गेले. सुंदर आणि उत्तम दर्जाचे नियोजन केले होते.

बालेवाडी वुमेन्स क्लबच्या अध्यक्ष रूपाली बालवडकर यांनी याबद्दल माहिती देताना मॅकन्यूज ला सांगितले की, सणासुदीच्या काळामध्ये महिलांना विविध वस्तूंची खरेदी करता यावी तशी जागा एकाच ठिकाणी व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच कोरोनामुळे बऱ्याच काळापासून लहान मुलांना विविध स्पर्धेमध्ये भाग घेता आला नाही. म्हणून लहान मुलांसाठी फॅशन शो चे आयोजन केले. लहान मुलांनी अतिशय उत्साहात त्यामध्ये सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन गझलकार निशिकांत देशपांडे, अर्निका गुजर, ॲड. माशाळकर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर, बालेवाडी वूमेन्स क्लबचे अध्यक्षा प्रा. रूपाली बालवडकर, बालेवाडी वूमेन्स क्लबच्या सदस्या उपस्थितीत होत्या.

See also  बाणेर येथे गरजू लोकांना शिवसेनेच्या वतीने धान्य कीट वाटप !