ऑस्ट्रेलियात लसीकरणाच्या सक्तीला नागरिक विरोध करत रस्त्यावर

0

मेलबर्न :

ऑस्ट्रेलियात गेल्या 20 दिवसांपासून दररोज 1600 पेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. दैनंदिन मृत्यूचा आकडादेखील वाढू लागला आहे. त्यासाठी मेलबर्नमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. केवळ लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाच कामासाठी बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सरकारच्या या निर्णयाला विरोध करत बांधकाम क्षेत्रातील शेकडो अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. लसीकरणाच्या सक्तीला हे नागरिक विरोध करत आहेत.

दुसरीकडे, हे आंदोलन उग्र होत असल्याचं पाहून पोलिसांनी आंदोलकांवर रबरी गोळ्या झाडल्या. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याच्या काही घटनाही यावेळी घडल्या. आतापर्यंत 72 जणांना यात अटक करण्यात आली आहे.

तर, चीनच्या हार्बिनमध्ये तीन कोरोना रुग्ण आढळल्यामुळे जिम, दुकानं आणि थिएटर बंद ठेवण्यात आले आहेत. डेल्टा व्हेरियंट 185 देशांमध्ये पसरला आहे. अमेरिकेतही कोरोनाने हाहाकार उडवला आहे.

See also  परकीय चलन साठ्याच्या संदर्भात भारत जगातील चौथा मोठा देश.