मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगर वाचला, रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश.

0

पुणे :

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने पुणे जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या तब्बल ११० मीटर रुंद रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून रस्ता करण्यात येणार होता.

परंतु वारकरी, स्थानिक लोक आणि आमदार यांनी तीव्र विरोध केल्याने सोमवार मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याचे आदेश एमएसआरडीसीला दिले.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुण्याच्या रिंगरोड प्रकल्पाला आता ख-या अर्थाने गती मिळाली आहे. पूर्व आणि पश्चिम असा दोन टप्प्यांत रिंगरोडचे काम करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यातील रिंगरोडसाठी शंभर टक्के मोजणी पूर्ण झाली असून, दुस-या टप्प्यातील पूर्व भागातील मोजणी सुरू आहे. एमएसआरडीसी वतीने हा रिंगरोड बांधण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात भोर तालुक्यातील केळवडे ते मावळ तालुक्यातील उर्सेख असा हा ६८ किलोमीटरचा रिंगरोड करण्यात येणार आहे. या रिंगरोड वरून ताशी तब्बल १२० किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार आहे.

परंतु या रिंगरोडच्या रेखांकनाबाबत काही आक्षेप होते. यासाठीच सोमवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात अजित पवार यांनी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदारांनी काय अडचणी आहेत ते सांगितले. तर प्रशासनाने कसा असेल रिंगरोड याचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी पहिल्या टप्प्यातील मोजणी पूर्ण झाली असून, लवकरच दर निश्चितीची प्रक्रीया सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.

See also  म्हाळुंगे - बालेवाडीतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा