म्हाळुंगे – बालेवाडीतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

0

आंतरराष्ट्रीय विद्यापीठात ऑलम्पिक पदक विजेते घडावेत : आ. चंद्रकांत दादा पाटील.

बालेवाडी :

म्हाळुंगे – बालेवाडी येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मंतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतला. यावेळी विद्यापीठातून ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक विजेते खेळाडू घडावेत. त्यांच्यासाठी अत्याधुनिक ज्ञान, प्रशिक्षणाची साधने व पुण्याच्या क्रीडानगरी नावलौकिकात भर घालणारी कामगिरी व्हावी अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बोकोरिया, क्रीडा संकुलाचे विविध अधिकारी, पुणे शहर भाजपाचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते डॉ. श्रीपाद ढेकणे बालेवाडी प्रभागातील नगरसेवक ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, राहुल कोकाटे, कोथरूड मंडल अध्यक्ष पूनित जोशी, प्रकाश बालवडकर, स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, विठ्ठल बराटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्यातील म्हाळुंगे – बालेवाडी येथे देशातील तिसरे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येत असून, या विद्यापीठाच्या माध्यमातून विविध क्रीडा कोर्सेस राबविले जाणार आहेत. याच्या कामाचा आढावा पाटील यांनी घेतला. यावेळी विद्यापीठाच्या प्रवेशाचे वेळापत्रक, कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया, मान्यता संस्थांकडून अभ्यासक्रमांना मान्यता मिळविणे व प्रशिक्षित व पात्र अध्यापक वर्ग इ. अनेक बाबींची स्पष्टता होणे आवश्यक आहे असे त्यांनी सूचित केले.

तसेच विद्यापीठाच्या भविष्य काळातील केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी सर्व प्रकारच्या सहकार्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. देशात तामिळनाडू, गुजरात नंतर महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या या विद्यापीठाची प्रगती जागतिक स्तरावर होऊन पुण्याच्या नावलौकिकात भर पडावी अशी अपेक्षा  पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, विद्यापीठाच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेऊन, येत्या शैक्षणिक वर्षात याची प्रवेश प्रक्रिया पूर्ण व्हायची असेल; तर तातडीने मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा या आढावा बैठकीचे संयोजक व भाजपाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी यावेळी केली.

See also  ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी एश्ले बार्टी ही 1978 नंतरची पहिली ऑस्ट्रेलियन