धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप

0

मुंबई :

महाविकास आघाडीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. संबधित तरुणी नातेवाईक असून तिने पोलिसांत धाव घेतली होती. ओशिवरा पोलीस ठाण्यात या संबधित तक्रार अर्ज दाखल केला असून सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप संबधित तरुणीच्या वकिलांनी केला.

याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. १० तारखेला याबाबतची तक्रार दिली. ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे.

वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, २००६ पासून यांच्यावर अत्याचार सुरु होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच, याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. तरुणीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत मदतीची साद घातली आहे.

 

See also  हर हर महादेव म्हणजे काय असतं हे पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे