भारतीय पॅरालिम्पिकपटूंचा खेळ बघून मला प्रेरणा मिळते : नरेन्द्र मोदी

0

नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा जपान सरकार आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अविश्वसनीय कामगिरी करणार्‍या भारतीय पॅरालिम्पिकपटूंची मुक्तकंठाने प्रशंसा केली. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 5 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांंस्यांसह विक’मी 19 पदके जिंकलीत.

भारतीय खेळांच्या इतिहासात टोकियो पॅरालिम्पिकला नेहमीच एक विशेष स्थान असेल. खेळ प्रत्येक भारतीयांच्या स्मरणात कायम राहतील व भविष्यातील पिढ्यांना खेळण्यास प्रोत्साहित करतील. आमच्या संघातील प्रत्येक सदस्य विजेता, स्त्रोत व प्रेरणा आहे. टोकियोमधील भारतीय पॅरालिम्पिकपटूंचा खेळ बघून मला प्रेरणा मिळते. आता भारतीय पॅरा अ‍ॅथ्लिट्सकडे देशाला बरेच काही देणे आहे. त्यांनी क्रीडा क्षेत्राबाहेर भूमिका बजावावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांची ही चित्रफित रविवारी सार्वजनिक करण्यात आली.

तुम्ही तुमच्या पराभवांमुळे पराभूतवादी मानसिकतेला पराभूत केले, ही एक मोठी गोष्ट आहे, अशा शब्दात मोदींनी भारतीय पॅरालिम्पिकपटूंचा गौरव केला. तुमच्याकडून छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा देशाला खूप प्रेरणा देऊ शकतात, तुम्ही देशाला पुढे कसे प्रेरित करू शकता. तुम्ही शाळा, परिसरांना भेट देऊ शकता. खेळांच्या जगाव्यतिरिक्त तुम्ही देशासाठी आणखी काही करू शकता आणि बदल घडवून आणण्यास मदत करू शकता, असेही ते म्हणाले. भविष्य उज्ज्वल आहे. मी नेहमीच तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आहे. तुमचे स्वप्न आमचे स्वप्न आहे व ते साकार करण्यासाठी मी सहकार्य करेल, असे ते म्हणाले.

See also  जपान मध्ये कोरोना मुळे दोन आठवड्यांची आणीबाणी : ऑलिंपिक संदर्भात महत्तवाच्या घोषणांची शक्यता