औंध येथे निर्माल्यकलश पुजन उत्साहात संपन्न

0

औंध :

औंध पायठा मित्र मंडळ गणेश मंदिर गोळवलकर गुरुजी शाळेजवळ औंध आरोग्य कोठी येथे आमदार सिद्धार्थ शिरोळे व माजी नगरसेवक सनी निम्हण, त्वष्टा कासार संस्थेचे चिटणीस निरंजन लोंबर यांच्या हस्ते निर्माल्य कलशांची पूजन करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी सर्वांनी निर्माल्य टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पर्यावरणस्नेही निर्मल गणेशोत्सव पुजना साठी
औंध विश्वस्त मंडळ अध्यक्ष योगेश जुनवणे,
औंधचा राजा लोकमान्य मित्र मंडळाचे अध्यक्ष हेरंब कलापुरे, मलिंग मित्र मंडळ चे राहुल गायकवाड, जगदंब ढोल ताशा पथकाचे अभिषेक तोडकर, सुप्रीम चोंधे, जीवित नदी संस्थेच्या शैलजा देशपांडे, मृणाल वैद्य
अनेक पर्यावरण गणेशोत्सव कार्यकर्ते, पुणे मनपाचे राजेंद्र वैराट, कविता निम्हण स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी गणेश कलापुरे यानी सर्वांना हा निर्मल गणेशोत्सव कशासाठी आहे या विषयी माहीती दिली.

प्रदूषणाचा विषय आज अत्यंत गंभीर झाला आहे, आणि यावर कुठल्याही एका संस्थेने अथवा व्यक्तीने काम करून चालणार नाही. यासाठी ही प्रदुषण विरोधी लोक चळवळ उभी करणे आवश्यक आहे. प्रदुषण सर्व समाज करतो आहे. मग प्रदुषण मुक्तीसाठी सर्व समाजाचा सहभाग आवश्यक आहे. यातून ही लोक सहभागाची चळवळ उभी रहावी पर्यावरणस्नेही उत्पादनाचा वापर वाढवा विविध बचत गट गणेशोत्सव मंडळे यांच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही उत्पादनाचे व्यवसाय उभे रहावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते पुण्याच्या पर्यावरणाच्या नकाशाचे अनावरण केले. या प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी जलपर्णि वर आणि नदी प्रदुषण यावर कायमची उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

सनी निम्हण यांनी सोमेश्वर मंदिर देवस्थान आणि स्वतः व्यक्तिगत रामनदि प्रदुषणमुक्त होण्यासाठी जे काही करणे शक्य असेल ते करू, त्यासाठी छोटे पाऊल म्हणून सोमेश्वर मंदिरात नीर्माल्याचे खत निर्मिती सुरू करू असे सांगितले.

शैलजा देशपांडे यांनी या उपक्रमचे कौतुक केले आणि नदी प्रदुषण याविषयी माहिती दिली. भूषण शेळके यांच्या वतीने गणपती बाप्पा ला प्रिय असणाऱ्या शमी वृक्षाचे रोपण सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

See also  असंघटित कामगारांना जिल्हाधिकाऱ्या हस्ते 'ई-श्रम' कार्ड वाटप.

गणेश कलापुरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले सर्व मान्यवरांचे सत्कार पायठा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले मंडळाचे अध्यक्ष राजेश खोले, जयवंत मोहिते, दत्तात्रय भगत, शेखर विघ्ने, सुनील जुनवणे यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. पर्यावरणस्नेही निर्मल गणेशोत्सव या मोहिमेचे नियोजन पायठा मित्र मंडळ आणि स्वप्नील जुनवणे, अनिरुद्ध मोहिते, गणेश कलापुरे यांनी केले.