रोहित शर्माने ठोकले परदेशी भूमीवरील कसोटीमधील पहिले शतक

0

लंडन :

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना चालू आहे. भारत दुसऱ्या डावात मजबूत आघाडीकडे वाटचाल करत आहे. दुसऱ्या डावात भारताकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतक केलं आहं.

वैयक्तिक 96 धावांवर असताना रोहितने षटकार ठोकत परदेशात पहिलं शतक झळकवलं आहे.

भारताचा पहिला डाव 191 धावांवर बाद झाला त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजानी जोरदार फलंदाजी करत 290 धावा केल्या. भारतावर 90 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर फलंदाजी करायला आलेल्या भारतीय सलामीवीरांनी इंग्लडच्या गोलंदाजांची पळता भूई करून सोडली. रोहित शर्माने परदेशी भूमीवरील कसोटीमधील सर्वोच्च धावा संख्या केली, रोहितला रॉबिन्सने बाद केलं.

राहुल नंतर आलेल्या पुजाराने दमदार फलंदाजी करत 61 धावांची खेळी केली. त्यामध्ये पुजाराने खणखणीत 9 चौकार लगावले. भारताजवळ 171 धावांची आघाडी असुन दुसऱ्या डावात सध्या 270 धावसंख्या झाली आहे. विराट कोहली 22 तर जडेजा 9 धावांवर खेळत आहे.

रोहित शर्मा जेव्हा पासून कसोटीत सलामीला येऊन फलंदाजी करत आहे. तशापासून तो धावांचा पाऊस पाडत आहे. लॉर्ड्स कसोटीत रोहितने 83 ठोकल्या होत्या. ती परदेशी मैदानावरील कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती. भारत सध्या पाच कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित सुटला. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दिमाखदार खेळ करत इंग्लंडवर 151 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामना भारताने एक डाव 76 धावांनी गमावला होता.

https://twitter.com/SonySportsIndia/status/1434161146102050818?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1434161146102050818%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  भारताचा घोडेस्वार फौआद मिर्जा व त्याची घोडी सेगनर मेडीकोट यांनीदेखील केला अंतिम फेरीत प्रवेश.