अंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत कारवाई करण्याची मागणी.

0

पुणे :

पुणे महापालिकेने राष्ट्रीय तालीम संघ, पुणे या संस्थेला अंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी दिलेल्या निधीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.

सन २०१६ ला खराडी येथे झालेल्या महापौर चषक अंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी राष्ट्रीय तालीम संघ पुणे या संस्थेला रूपये १ कोटी २६ लाख ५० हजार १४ रुपये एवढा निधी दिला होता. सदर निधीमध्ये मोठया प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करून भ्रष्टाचार केलेला आहे. त्याबाबत आम्ही वेळोवेळी मनपाकडे लेखी तक्रारी केलेल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस गोरखनाथ भिकुले यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना दिली आहे.

या प्रकरणात सन २०२० ला तत्कालीन आयुक्तनी मनापाच्या दक्षता विभागचे प्रमुख राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक करून १५ दिवसात चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावर कोणतीही
कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतर दि.०१/०२/२०२१ रोजी आपली समक्ष भेट घेवून लेखी तकार केली यावर आपण दि.०२/०२/२०२१ ला चौकशी समितीचे प्रमुख (दक्षता विभाग) राजेंद्र मुठे यांना सदर प्रकरणाची चौकशी व सुनावणी घेवून आठ दिवसात सदरचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. परंतु
आजमितीला सहा महिने होवून गेले तरी पुढील कारवाई झालेली नाही.

सदर प्रकरणाबाबत पुणे महानगरपालिकेकडे माहिती अधिकाराचे कागदपत्रांचे पुरावे सादर करून देखील संबंधीत प्रशासन अद्यापपर्यंत कारवाई करीत नाहीत. याचा अर्थ प्रशासन कोणाला पाठिशी घालत आहे का असा प्रश्न निर्माण होतो, असे निवेदन महापालिका आयुक्तांना देऊन लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस गोरखनाथ भिकुले यांनी केली आहे.

See also  अजित पवारांचा विरोधात पुरावे द्या खरं असेल तर मी स्वतः तक्रार करेन : सुप्रिया सुळे