पहिल्या तरंगत्या सौर प्रकल्पाची उभारणीला सुरूवात

0

दिल्ली :

दिवसेंदिवस ऊर्जेची मागणी वाढत आहे. सद्यस्थिती पाहता उपलब्ध संसाधनांच्या माध्यमातून ही मागणी पूर्ण करण्यावर भविष्यात मर्यादा येऊ शकतात.

त्यामुळे सौर ऊर्जेचे महत्व हे अधोरेखित होते. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने नुकतीच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील सिम्हाद्री थर्मल स्टेशनच्या जलाशयावर सर्वात मोठ्या फ्लोटिंग म्हणजेच तरंगत्या सोलर पीव्ही प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात केली आहे. याशिवाय एनटीपीसी देशभरात अनेक अशा प्रकल्पांवर देखील काम करत आहे. यामुळे वाढत्या ऊर्जोच्या मागणीवर आगामी काळात सौर ऊर्जा हे प्रभावी उत्तर ठरु शकणार आहे. एनटीपीसीने 2032 पर्यंत 60 गिगावॅट अक्षय्य ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

एनटीपीसी ही भारतातील पहिली वीज कंपनी आहे की ज्या कंपनीने युनायटेड नेशन्स हाय लेव्हल डायलॉग ऑफ एनर्जीचा भाग म्हणून आपल्या ऊर्जा करारांचे लक्ष्य घोषित केले आहे. एनटीपीसी समूहाकडे 17 गिगावॅटपेक्षा जास्त वीज क्षमता ही निर्माणाधीन आहे आणि त्यात 5 गिगावॅट अक्षय ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. पर्यावरपूरक वीज प्रकल्पांद्वारे परवडणाऱ्या किंमतीत अखंडित वीजपुरवठा हे एनटीपीसीचे वैशिष्ट्य आहे. या प्रकल्पाबाबतचे वृत्त टीव्ही 9 हिंदीने दिलं आहे. Tokyo Paralympics 2020 : हे PHOTO पाहून थक्क व्हाल! 2018 मध्ये अधिसूचित करण्यात आलेल्या फ्लेक्सिबिलायझेशन योजनेंतर्गत केंद्र सरकार या पहिल्या तरंगत्या सौर प्रकल्पाची उभारणी करत आहे. याशिवाय एनटीपीसी अनेक ऊर्जा प्रकल्पांवर काम करत आहे. एनटीपीसीने गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भारत -पाकिस्तान सीमेनजीक माळरानावर एक सौर ऊर्जा पार्क उभारण्याची तयारी सुरु केली आहे.

या पार्कमध्ये सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पासाठी अनेक कंपन्यांना जमिनी यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प खवडा आणि विघकोट या गावांदरम्यान साकारला जात आहे. या प्रकल्पाची साइट खवडा गावापासून 25 किलोमीटर दूर असून हे सीमावर्ती भागातील शेवटचे टोक आहे, तसेच येथे नागरिकांना सहज पोहोचणे शक्य आहे. एका अहवालानुसार, गुजरातची सध्याची कमाल वीज मागणी 18,000 मेगावॅट आहे. राज्याने स्थापित केलेल्या 35,000 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेपैकी 11,264 मेगावॅट ही अक्षय्य ऊर्जा असून तिचे प्रमाण 37 टक्के आहे. यात पवन, सौर, बायोमास आणि मिनी हायड्रो प्रकल्पातून तयार होण्याऱ्या विजेचा समावेश आहे. विशाखापट्टणममधील एका मोठ्या तलावावर उभारण्यात येत असलेला फ्लोटिंग म्हणजेच तरंगता सौर इन्स्टॉलेशन प्रकल्प एका अनोख्या अँकरिंग डिझाईनने साकारलेला आहे. हा आरडब्ल्यूबी सुमारे 75 एकर क्षेत्रावर विस्तारला आहे. या तरंगत्या सौर प्रकल्पाव्दारे 1 लाखाहून अधिक सौर पीव्ही मॉड्यूलमध्ये वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे. यामुळे 7 हजार घरं दिव्यांनी उजळून निघाणार असून, या प्रकल्पामुळे दरवर्षी कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन किमान 46,000 टनांनी कमी होईल.

See also  भारत बायोटेक कडून 'नेझल व्हॅक्सिन' ची ट्रायल सुरू

या तरंगत्या सौर प्रकल्पामुळे दरवर्षी किमान 13640 लाख लीटर पाण्याची बचत अपेक्षित आहे. एवढे पाणी 6700 घरांची वार्षिक गरज पुर्ण करण्यासाठी पुरेसे असेल. 2000 मेगावॅटचा कोळश्यावर आधारित सिम्हाद्री स्टेशन प्रकल्प हा बंगालच्या उपसागरातून सीडबल्यू प्रणालीसाठी सागरी पाणी प्राप्त करणारा पहिला वीज प्रकल्प असून तो 20 वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत आहे. एनटीपीसीने प्रायोगिक तत्त्वावर सिम्हाद्री येथे हायड्रोजन आधारित मायक्रो-ग्रीड यंत्रणा उभारण्याची योजना आखली आहे. 66900 मेगावॅट क्षमतेच्या एकूण स्थापित क्षमतेसह एनटीपीसी समूहाकडे 29 नवीकरणीय प्रकल्पांसह 71 वीज केंद्रे आहेत.