7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिवस म्हणुन साजरा केला जाणार

0

नीरज…हे नाव आता प्रत्येक भारतीयाला माहिती आहे. हे त्या खेळाडूचे नाव आहे, ज्याने ऑलिम्पिकम 2020 मध्ये 7 ऑगस्ट विक्रमी भाला फेकला आणि भारताचे नाव रोषण केले. ऑलिम्पिकमध्ये भारताला यापुर्वी गोल्ड मेडल मिळालं होतं, मात्र एथलॅटीक्समध्ये मिळालेलं हे पहिलं गोल्ड मेडल. त्यामुळे नीरज चोप्राची ही कामगिरी ऐतिहासिक आहे. त्यानिमीत्तानेच एथलॅटीक्स फेडरेशन ऑफ इंडीयाने 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिवस म्हणुन साजरा केला जाणार असल्याचे घोषित केले आहे.

भालाफेक मध्ये नीरज चोप्राने दमदार कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात 87.03 अशी उत्तम भालाफेक केला होता. तर दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा 87.58 असा विक्रमी भाला फेकला आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. 7 ऑगस्टला नीरजने फेकलेल्या भाल्याने फक्त 87.58 मीटरचे अंतरच पार केले नाही तर देशातील त्या प्रत्येक खेळाडूसाठी एक प्ररणा निर्माण केली.

नीरजच्या या उत्तंग यशामागे असलेल्या परिश्रमांता सन्मान आणि भविष्यात इतर खेळांडूंनीही असेच यश मिळवावे याच हेतुन एथलॅटीक्स फेडरेशन ऑफ इंडीयाने हा दिवस जॅवेलीन थ्रो डे म्हणुन साजरा केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

See also  विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याची मुंबईची ही चौथी वेळ