पाषाण येथे वात्सल्य फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब परिवारातील 50 मुलींना ड्रेस मटेरियल शिलाई खर्चा सहित वाटप.

0

पाषाण :

कोरोनाचा सर्वाधिक फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बसला. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून त्यांना कोणत्याही प्रकारे सण-समारंभ साजरा करता आला नाही. परिणामी त्यांच्या मुलांनाही या आनंदाच्या क्षणापासून मुकावे लागले. या लहान मुलींच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसावे या हेतूने, भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि वात्सल्य फाऊंडेशनच्या माध्यमातून आज पाषाण गावातील पंचशील बौद्धविहार या ठिकाणी गरीब परिवारातील 50 मुलींना ड्रेस मटेरियल शिलाई खर्चा सहित देण्यात आले.

पाषाण येथे झालेल्या कार्यक्रमासाठी नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, वात्सल्य फाऊंडेशनच्या अध्यक्ष अनुराधा एडके, सहकार आघाडीचे पुणे शहर प्रभारी व वात्सल्य फाउंडेशनचे खजिनदार प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, नवनाथ ववले, राजेन्द्र पाषाणकर, प्रमोद कांबळे, प्रविण आमले, नारायण जाधव, नंदू जाधव, विजय सुपेकर, रामभाऊ चव्हाण, सुहास पाषाणकर, शरद पाषाणकर, विराज कोकाटे, आकाश पवार, निरज जेजुरकर, टिम वात्सल्यचे राजभाई तांबोळी, चंद्रकांत पवार, रमाई महिला गटाच्या प्रतिभा जाधव आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन कोथरुड मतदारसंघाचे अध्यक्ष पुनित जोशी यांच्या सहकार्याने स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर आणि कोथरुड भाजपा उपाध्यक्ष उत्तम जाधव यांनी केले.

See also  खासदार सुप्रिया सुळे यांनी केली सुस पुलाची पाहणी.