औंध :
ॲड. मधुकर मुसळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 20 जुलै रोजी औंध आयटीआय मध्ये घनदाट गार्डन वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला
या प्रकल्प ॲड, मधुकर मुसळे, नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे, रोटरी क्लब बाणेर, सह्याद्री देवराई फाउंडेशन यांनी संयुक्तपणे केला
या ठिकाणी पंधरा हजार फूट जागेमध्ये साडेतीनशे वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये अनेक औषधपयोगी आयुर्वेदिक मूल्यांच्या वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. या ठिकाणी ऑक्सिजन बँक निर्मिती करीत असताना पक्षी व फुलपाखरं यांच्या साठी पूरक असलेले सर्व वृक्ष वेलींचे वृक्षारोपण या घनदाट गार्डन मध्ये करण्यात आले आहे. वृक्षारोपण यासोबतच या ठिकाणी ताबडतोब ड्रिप इरिगेशन ची व्यवस्था करण्यात आली आहे.
या ऑक्सिजन बँकमध्ये पक्षांसाठी व फुलपाखरांसाठी मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध असेल व पुढील दोन ते तीन वर्षात पक्षांचा किलबिलाट अनुभवायला मिळेल. या प्रकल्पाच्या प्रकल्पाचे पुढील तीन वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारी रोटरी क्लब ऑफ बाणेर ने घेतली आहे. त्यानंतर ही सर्व झाडे नैसर्गिक रित्या पूर्ण उंचीपर्यंत वाढतील.
त्याचबरोबर ॲड. मुसळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त औंध व औंधला लागून असलेल्या बाणेर भागांमधील सोसायट्यांच्या सुरक्षा रक्षकांचे साई श्री हॉस्पिटल मध्ये लसीकरण करण्यात आले. एकूण 550 सुरक्षा रक्षकांचे लसीकरण या उपक्रमामध्ये करण्यात येणार असून हा उपक्रम 20 जुलै पासून 25 जुलै 2021 पर्यंत चालू राहणार आहे.
त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त अनाथ केंद्रामध्ये फळे व अनाथ आश्रमाला आर्थिक स्वरूपात मदत केली.
वृक्षारोपण कार्यक्रम व लसीकरण कार्यक्रमाला नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे ॲड. मधुकर मुसळे, आयटीआयचे जॉईंट डायरेक्टर गावित , प्राचार्य सायगावकर सर , रोटरीचे डायरेक्टर रुपानी ,के डी काब्रा, संकेत, रमेश केळुस्कर, दिलीप देशमुख , श्री व सौ लटांबळे, उज्वला पाटील, शुभांगिनी सांगळे, नाडगौडा, मयूर मुंढे, संकेत सांगळे, सरोज, शिवचंद्र आदि मान्यवर उपस्थित होते.