खासदार सुप्रिया सुळे यांनी केली सुस पुलाची पाहणी.

0

पाषाण :

खासदार सुप्रिया सुळे यांनी सुस रोड, पाषाण व सुसगाव ला जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. या वेळी पुलामध्ये असलेल्या त्रुटी समस्या तसेच पुलासाठी लागणाऱ्या विकास निधीची तरतुद करण्यासंदर्भात सूचना देखील करण्यात आल्या.

यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, सुषमा निम्हण, रोहिणी चिमटे, सचिन दोडके, सुनील चांदेरे, सागर बालवडकर, समीर उत्तरकर, विशाल विधाते, निलेश पाडाळे, कुणाल वेडे पाटील, मनोज बालवडकर आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गावरील कामे वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच महामार्गालगत असलेले रस्ते देखील पूर्ण केल्यास महामार्ग सुरक्षित होईल. नगरसेवक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी या संदर्भामध्ये लवकरच आयुक्तांची देखील भेट घेतील. तसेच या पुला संदर्भात  अधिकाऱ्यांनी २०२२ ऑगस्ट पर्यंत काम पूर्ण होईल अशी माहिती सांगितले असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

या वेळी सुनिल चांदेरे यांनी बिटवाईज कंपनी समोर असलेला पूल हा चुकीचा झाला असून तो दुचाकी अंडरपास चार चाकी करण्यात यावा अशी मागणीही खासदारकडे केली.

नगरसेवक बाबूराव चांदेरे यावेळी म्हंटले की, भाजपा श्रेय वादासाठी शेवटच्या वर्षांमध्ये विकास कामे करत आहे. मागील चार वर्षात कोणतेही ठोस विकास कामे न झाल्याने शेवटच्या वर्षात भाजपा श्रेय घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.

यावेळी प्रमोद निम्हण यांनी मागणी केली की, महामार्ग शेजारी असणाऱ्या सर्विस रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आयुक्तांना पत्र देण्यात यावे व प्रलंबीत काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. या पुलाच्या कामासाठी वारंवार पाठपुरावा केला असून  दोन वेळा रास्ता रोको आंदोलनही केले आहे.

यावेळी रोहिणी चिमटे यानी सांगीतले की, राष्ट्रवादी काँग्रेस ची पालिकेत सत्ता असताना पुलाचे बजेट हेड करण्यात आले आहे. काही तांत्रिंक अडचणीमुळे पुलाचे काम होण्यास उशीर झाला.

काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून देखील पाहणी करण्यात आली होती. यामुळे सुस व पाषाण ला जोडणारा महामार्गावरील पूल हा सध्या  श्रेय वादाच्या चर्चेत आहे.

See also  पाषाण येथे लसीकरण सुरू