पाषाण येथे लसीकरण सुरू

0

पाषाण :

कोरोना ची वाढती परिस्थिती लक्षात घेता, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वर वाडी या भागामध्ये करोना लसीकरणाची सोय नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. नागरिकांनी वारंवार केलेल्या मागणीचा विचार करून पाषाण गावा मध्ये कै़.सहदेव निम्हण कुटी रूग्णालय या ठिकाणीं सहाय्यक आयुक्त जयदीप पवार यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे सोमवारी लसीकरण सुरू झाले.

या वेळी नागरीकांना लसीकरण नोंदणी करता स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर यांनी सहकार्य केले. तसेच लसीकरण ठिकाणी प्यायचे पाणी उपलब्ध नसल्याने तेथे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. नागरिकांची गैरसोय थांबल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे भाव होते.

लसीकरण सुरु झाल्यामुळे पाषाण सुतारवाडी सोमेश्वर वाडी या परिसरातील लोकांची गैरसोय दूर झाली आहे. नागरिकांनी निर्भीडपणे लसीकरण करून घ्यावे असे आव्हान स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर यांनी केले. करोना विरुद्ध लढा देताना सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

या वेळीं स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, यांनी आवर्जुन उपस्थित राहून नागरिकांना लसीकरण करताना कोणत्याही अडचणी येऊ नये याकडे लक्ष दिले.

 

See also  रिंग रोड च्या मोजणी वरून प्रशासन आणि शेतकरी यांच्यात संघर्ष