न्यू सम्राट स्पोर्ट क्लब कबड्डी सुस संघाच्या वतीने गुरूंना वंदन करत गुरुपौर्णिमा साजरी.

0

सूस :

न्यू सम्राट स्पोर्टस क्लब कबड्डी संघाच्या वतीने गुरूंना वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संघातील खेळाडू ग्रामपंचायत सदस्य अमोल काशिनाथ चांदेरे यांनी व इतर सर्व खेळाडूंनी मिळून केले. संघातील जडणघडणीमध्ये त्यांचा हातभार लागला, वेळोवेळी मार्गदर्शन करून संघातील खेळाडूंना आकार दिला असे नंदकुमार फणसे विकास भालेकर यांच्यासहित संघातील इतर माजी खेळाडूंचा मार्गदर्शकांचा सन्मान या वेळी करण्यात आला. यावेळी संघातील सर्व आजी माजी खेळाडू उपस्थित होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अमोल चांदेरे यांनी सांगितले की, आमचे गुरू मार्गदर्शक नंदकुमार फणसे आणि विकास भालेकर यांच्या समवेत इतर सर्व संघातील माजी खेळाडूंनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करून आमच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही संघाची यशस्वी वाटचाल करत आहे. म्हणूनच त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता त्यांना वंदन करत आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना संघाचे प्रशिक्षक नंदकुमार फणसे यांनी सांगितले की, संघातील खेळाडूंनी नेहमी संघासाठी खेळून संघाची एकजूट टिकवून ठेवली आहे. सर्व जण निर्व्यसनी राहून संघा प्रमाणे आपल्या आयुष्यात देखील यशस्वी राहो ही सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

See also  चांदणी चौकातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष पाहणी.