नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक केली आयोजित , शिवसेना करणार आरक्षण मुद्दा उपस्थित : संजय राऊत

0

मुंबई :

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार १९ जुलैपासून सुरु होत आहे. संसदेचे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाचं कामकाज १९ दिवस चालणार असून १३ ऑगस्टला अधिवेशनाचा शेवटचा दिवस असेल. अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. या बैठक शिवसेना मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत मोदींकडे इम्पेरिकल डेटाची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.

संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाच्यापुर्वी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत चर्चेचे मुद्दे उपस्थित केले जातात, शिवसेना महाराष्ट्राकडून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणार आहे. आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेत सवलत आणि ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी करण्यात येईल.

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून कायद्यात बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असल्याचे सांगितले आहे. यामुळे केद्र सरकार १०२ व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करुन राज्यांना अधिकार देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने ही दुरुस्ती करत असताना ५० टक्के आरक्षाची जी मर्यादा आहे त्याबाबतही दुरुस्ती करावी जेणेकरुन पुढील कायदा करताना काही अडचणी येऊ नयेत अशी मागणी राज्याकडून करण्यात येणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे ओबीसी राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे इम्पेरिकल डेटाची मागणी केली जाईल परंतु हा डेटा राज्याने घ्यायचा की केंद्राने द्यायचा याबाबत वाद होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील महागाई आणि इंधन दरवाढीवरुन हे अधिवेशन तापणार असल्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी आंदोलनही पुन्हा एकदा तीव्र होणार असल्याचा इशार शेतकऱ्यांनी दिला आहे.

महाराष्ट्रातील ज्वलंत विषयांवर चर्चा करणार – संजय राऊत

See also  पेट्रोल डिझेल नंतर आता सीएनजीच्या किंमतीतही वाढ !

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशातील ज्वलंत विषयावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. देशात दुसरी लाट भयानक होती यानंतर आता तिसरी लाट आली आहे. याबाबत चर्चा केली पाहिजे. देशातील लोकांसाठी अन्न, वस्त्र निवारा आणि पेट्रोल डीझलच्या दरवाढीवर चर्चा करण्यात आली पाहिजे असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. चीनची घुसखोरी झाली आहे. चीनने पुन्हा एकदा लडाख सारख्या भागात घुसखोरी केली असून हा विषय खूप संवेदनशील आहे यामुळे केंद्र सरकारने या विषयावर देखील चर्चा केली पाहिजे. शिवसेनेचे खासदार लोकसभेत आणि राज्यसभेत संधी मिळाली तर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर बोलणार आहोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करु असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.