संसदीय संरक्षण समितीच्या बैठकीतून काँग्रेस नेते राहुल गांधी वॉक आउट

0

नवी दिल्ली :

चीन – भारत सीमा तंट्यावर चर्चेसाठी बोलविण्यात आलेल्या संसदीय संरक्षण समितीच्या बैठकीतून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सदस्यांनी वॉक आउट केले.
सीमा तंट्यावर ही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल (LAC) च्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस सदस्यांनी केली. मात्र समिती अध्यक्षांनी ही चर्चा करण्यास नकार दिल्याचे कारण देऊन संतापलेल्या काँग्रेस नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ते बाहेर पडले.

संरक्षण संसदीय समितीच्या बैठकीचा अजेंडा २९ जून रोजीच ठरला होता. मात्र राहुल गांधी अजेंड्यात नसलेल्या विषयावर चर्चा करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच अध्यक्षांनी त्यांची विनंती फेटाळली असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

यापूर्वीही राहुल गांधींनी डिसेंबर २०२० मध्येही संसदीय संरक्षण समितीच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता. त्यावेळीही अजेंड्या व्यतिरिक्त पूर्व लडाखमध्ये देशाची काय तयारी आहे?, चीनबाबत रणनीती काय आहे?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. पण तेव्हाही समितीत या विषयाची चर्चा झाली नव्हती म्हणून त्यांनी बहिष्कार घातला होता.

See also  देशातील पहिला सीएनजी ट्रॅक्टर आज होणार लाँच !