ब्लॅक फंगसमागे दीर्घकाळासाठी वापरण्यात येणारा एकच मास्क हे कारण असू शकते : नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. एस.एस.लाल

0

कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमध्ये आता काळ्या बुरशीमुळे चिंता वाढली आहे. देशातील बर्‍याच राज्यांत ब्लॅक फंगसच्या शेकडो घटना समोर आल्या आहेत. या आजाराबाबत होत असलेल्या संशोधनामध्ये त्याच्या उद्रेकामागील कारणांची माहिती मिळू लागली आहे. हा वेगाने पसरणारा आजार केवळ रूग्णांचे डोळे, नाक आणि मेंदूलाच नुकसान करीत नाही तर यामुळे रुग्णांचा जीवही घोक्यात आला आहे. आता रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिसच्या वाढीमागे मास्कचा ओलावा हे कारण असल्याचे मानले जात आहे. वरिष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. एस.एस.लाल यांनी माध्यम एजन्सीशी बोलताना सांगितले की, ब्लॅक फंगसमागे दीर्घकाळासाठी वापरण्यात येणारा एकच मास्क हे कारण असू शकते.

लाल म्हणाले की, मास्कवर जमा झालेल्या घाणीमुळे आणि मास्कवर आढळणाऱ्या आद्रतेमुळे ब्लॅक फंगसचे संक्रमण होऊ शकते. डॉ. लाल यांनी पुढे माहिती दिली की, कोविड-19 च्या रुग्णाला आयसीयूमध्ये बराच काळ वापरण्यात येणाऱ्या ऑक्सिजनमुळेही हा बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. स्टिरॉइडचा उच्च डोस कोविड रुग्णाला दिला जातो, त्यानंतर रुग्णाची साखरेची पातळी वाढून अशा प्रकारचे संक्रमण होण्याची दाट शक्यता आहे.

डॉ. जैन म्हणतात की, काळी बुरशी प्रथम नाकातून सायनस आणि नंतर डोळे व मेंदूत पोहोचते. तेथे ती हळूहळू नुकसान करायला सुरुवात करते. अशा अवस्थेत काही प्रकरणांमध्ये रुग्णाचा मृत्यूही होतो. ब्लॅक फंगस नाकाद्वारे शरीरात प्रवेश करत असल्याने मास्कबाबत शंका उपस्थित झाली आहे. अनेक तज्ञ म्हणतात, अधिक दिवस सतत एकच मास्क परिधान केल्याने काळ्या बुरशीला आमंत्रण ठरू शकते. एकच मास्क स्वच्छ न करता वापरल्याने त्यावर फंगस चढू शकतो, जो आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही. म्हणूनच, असा अंदाज वर्तविला जात आहे की मास्क देखील काळ्या बुरशीचे कारण असू शकते.

नेत्रतज्ज्ञ डॉ. केशव स्वामी यांनी सांगितले की, वातावरणात फंगस आढळलो. त्यामुळे, पावसाळ्यात काळ्या बुरशीचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच कोविड-19 मधून बाहेर पडलेल्या लोकांनी दररोज मास्क स्वच्ह धुवून, सूर्यप्रकाशात वाळवून वापरावे. तसेच मास्क सतत बदलत राहणेही फायद्याचे ठरू शकते.

See also  पाकिस्तानी महिलेची ग्रामपंचायत प्रमुखपदी निवड : उत्तर प्रदेश मधील घटना.