महासत्ता अमेरिका कोरोनासमोर हतबल ! मृतांची संख्या 3 लाखांवर….

0

वॉशिंग्टन:-

अमेरिकेत कोरोना संसर्गाचे थैमान सुरू असून प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे. अमेरिकेत कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची संख्या 3 लाखांवर पोहचली आहे.
जगभरातील इतर देशांपेक्षा अमेरिकेत सर्वाधिक बाधित आणि कोरोना मृत्यू नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेत एक कोटी ६० लाखांहून अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, मृतांची संख्या 3 लाखांवर पोहचली आहे. अमेरिकेचे संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. अँथोनी फॉस्सी यांनी सांगितले की, ही संख्या हैराण करणारी आहे. १९१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या महासाथीनंतर १०२ वर्षांनी श्वसन यंत्रणेवर परिणाम करणारा महासाथीचा आजार आले आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या तीन लाख असली तरी प्रत्यक्षात ही संख्या अधिक असण्याचीही भीती आहे.
अमेरिकेत कोरोनामुळे मृत होणाऱ्यांमध्ये ६५ व त्या वर्षावरील रुग्णांची संख्या मोठी आहे. मृतांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक आहे.कोरोनाबाधितांच्या संख्येत पुरुषांपेक्षा महिलांची किंचत अधिक आहे. मात्र, आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या पुरुषांची संख्या अधिक आहे.आयसीयूमध्ये ६१.७ टक्के पुरुषांवर उपचार होतात. तर, ५४.१ टक्के पुरुषांचा मृत्यू होत असल्याचे ‘गार्डियन’ने वृत्तात म्हटले आहे.

See also  जीएसटी भरपाई म्हणून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नुकसान भरपाईपोटी 44 हजार कोटी.