भारतीय लष्कराने लसीकरणाचा सर्जिकल स्ट्राइक करून मिळवला कोरोना महामारीवर विजय

0

नवी दिल्ली :

जगातील सर्वोत्कृष्ट सैन्य असा नावलौकिक भारतीय लष्कराचा आहे. अतिशय शिस्तीचे भोक्ते असलेल्या अशा लष्कराने कोरोना महामारीवर लसीकरण करून विजय मिळविला आहे.

लष्कराने लसीकरणाच्या सर्जिकल स्ट्राइक करून हा पूर्ण विजय मिळवला आहे.विशेष म्हणजे जवानांचे 81 टक्के लसीकरण पूर्ण केले. तसेच कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यात यश मिळवले आहे. देशात आता दिवसाला लाखो कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.

दुसरीकडे लष्करी जवानांमध्ये मात्र, हे प्रमाण नगण्य आहे. जे जवान कोरोनाबाधित मिळत आहेत ते एकतर सुटीवर गेलेले अथवा कुटुंबीयांसोबत राहून परतलेले जवान आहेत. त्यांची संख्या ही बोटावर मोजण्याऐवढीच आहे. पण छावणीत आल्यावर त्यांच्यावर प्रभावी उपाय करून त्यांना कोरोनामुक्त केले जात आहे, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे.

‘ऑपरेशन नमस्ते ‘ ते ‘जान हैं तो जहाँ हैं ! ‘

गेल्या वर्षी देशात कोरोनाची लाट आली होती. तेव्हा मार्चमध्ये पहिला लॉकडाऊन जाहीर झाला. तेव्हा त्याची अंमलबजावणी कशी करावी, अशी चर्चा सुरु होती. तेव्हा लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी ही परिस्थिती आम्ही व्यवस्थित हाताळू आणि कोरोना नियंत्रणात आणू शकतो, आमच्यावर सर्व जबाबदारी सोपवा, असे सांगितले होते.

तसेच लष्करातील जवान कोरोनापासून दूर राहावेत यासाठी ऑपरेशन नमस्ते , ही मोहीम राबविली होती. तसेच लष्कराला पाचारण केले तर जवानांनी हा प्रसंग कसा हाताळावा, याचे प्रशिक्षण गेल्या वर्षी मार्चमध्ये देण्यास सुरुवात केली होती. अर्थात त्यावेळी कोणत्याही राज्यांनी पूर्ण लॉकडाऊन केल्याने लष्कराची मदत मागितली नाही. पण, आता जवान मात्र कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सज्ज आहेत. दुसऱ्या लाटेत परिस्थिती आटोक्यात येत नसेल तर लष्कराने राबविलेली धोरणे स्वीकारा. प्रसंगी लष्कराची मदतही घ्यावी. कारण “जान हैं तो जहाँ हैं !

See also  वंचित आणि गरिबांना मोफत न्यायदान सेवा देण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचा विचार केला जावा : उपराष्ट्रपती