बँकेच्या वेळेत बदल : पैसै काढणे आणि भरणे येवढेच काम करता येईल.

0

मुंबई :

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने २२ एप्रिल २०२१ च्या रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे २०२१ च्या सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची कडक म्हणजे अत्यंत कडक अंमलबजावणी होणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

आता बँकेशी संबंधित कामे करायची असल्यास सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतच ग्राहकांना फक्त पैसे भरणे आणि पैसे काढणे एवढीच कामे करता येणार आहेत. १ मे पर्यंत इतर व्यवहार करता येणार नाहीत.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात सुधारित नियमावली लागू होणार आहे. राज्य सरकारला खात्री पटली आहे की महाराष्ट्र राज्यामधे कोविड-१९च्या संसर्ग फैलावापासून धोका आहे आणि त्यामुळे हा विषाणू फैलाव रोखण्यासाठी आणि संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी काही आपत्कालीन पावले उचलणे अपरिहार्य झाले आहे. साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील कलम २ आणि आनुषंगिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदी यातून प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण राज्यभर खालील उपाययोजना लागू केल्या जातील. यामुळे बँकेच्या कामकाजावरही परिणाम होणार असून वेळाही बदलणार आहेत.

कार्यालयीन उपस्थिती बाबतही सरकारने नियमावली लागू केली असून त्याचीही संबंधित कार्यालयांनी अंमलबजावणी करायाची आहे. सर्व सरकारी कार्यालये (राज्य, केंद्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या अखत्यारितील) कोविड-१९ व्यवस्थापनाच्या संदर्भातील थेट आपत्कालीन सेवा वगळता उर्वरित कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के उपस्थितीत कामकाज करतील.

ब्रेक द चेन किंवा संसर्गसाखळी तोडा या शीर्षाखाली दिलेल्या १३ एप्रिल २०२१ च्या आदेशांमधील कलम २ नुसार उल्लेखित सर्व जीवनावश्यक सेवांसाठी लागणाऱ्या कामकाजासाठी किमान कर्मचारी संख्येत काम करावे आणि उपस्तिती कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांवर जाणार नाही, हे बघावे.

जीवनावश्यक सेवा प्रत्यक्ष पुरवण्याच्या कामी तैनात करण्यात आलेल्या मनुष्यबळासंदर्भात किमान मनुष्यबळ वापरावे पण हे मनुष्यबळ शंभर टक्क्यांपर्यंतही वाढवण्याची मुभा आहे. गेल्या वर्षीही कोरोनाचे संकट सुरू झाल्यानंतर अशाच प्रकारचे निर्बंध घालण्यात आले होते.

See also  फळपिकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था उभारणार : अजित पवार