बाणेर येथे दोनशे बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात येणार : महापौर

0

बाणेर :

बाणेर येथे सुरु होत असलेल्या दुसर्या कोविड हॅास्पिटलच्या इमारतीचे महापौर व महापालिका आयुक्त यांच्यासमवेत केली पाहणी, या ठिकाणी 200 बेड चे हॉस्पिटल उभारण्यात येणार असून, कोरोना च्या दुसऱ्या लाटेत वाढत असलेल्या रुग्णांसाठी लाभदायी ठरणार आहे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बाणेर सर्वे नं.३३ येथे दुसरे कोविड हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आहे. याच कोविड हॅास्पिटलची पाहणी आज महापौर मुरलीधर मोहळ, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, सभागृह नेते गणेशजी बिडकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या सोबत पाहणी केली. याप्रसंगी नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, प्रल्हाद सायकर, डॉ सागर बालवडकर, मनोज बालवडकर, नितीन कळमकर, रोनक गोटे, शशिकांत बालवडकर, समीर चांदेरे, विशाल विधाते आदी उपस्थित होते.

१ महिन्याच्या आत सदर हॅास्पिटलचे काम पुर्ण होणार आहे. तसेच यामध्ये सुमारे १५० ऑक्सिजन बेड व ५० आय.सी.यु. बेड अशा सुमारे २०० बेडची सुविधा याठिकाणी नागरीकांसाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी महापौर निधीतून दीड कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

सदर कोविड हॉस्पिटलचे काम महापौर निधीतून व सी.एस.आर. फंडातुन होत आहे. सद्य परिस्थिती पाहता बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पंचवटी, सुस, म्हाळुंगे या भागातील नागरिकांना तसेच शहराच्या इतर भागातील नागरिकांना ही एक दिलासादायक बातमी आहे.

See also  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा : माजी नगरसेवक सनी निम्हण यांचे आवाहन