मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन वाढण्यासाठी एमजी मोटर इंडियाचा पुढाकार… 

0

नवी दिल्लीः

मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन वाढण्यासाठी एमजी मोटर इंडिया ने देवनंदन गॅसेस प्रायवेट लिमिटेड सोबत पार्टनरशीप केली आहे. सध्या देशात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. हॉस्पिटल्स आणि रुग्णांना मोठा सामना करावा लागत आहे. २०११ मध्ये स्थापना करण्यात आलेल्या देवनंदन गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड बडोदा आणि अहमदाबादच्या प्रमुख मेडिकल  ऑक्सिजन गॅस उत्पादन पैकी एक आहे.

एमजी मोटर इंडिया मेडिकल ऑक्सिजन च्या उत्पादनात वापरण्यात येत असलेल्या उपकरणाच्या सुधारणा आणि उत्पादन प्रक्रियेत होत असलेले नुकसान कमी करण्याच्या दिशेने मदत करण्यात येणार आहे. यासाठी अन्य क्षेत्रात सहकार्य केले जाऊ शकते.

पुढील दोन आठवड्यात उत्पादन क्षमता २५ टक्के वाढवण्यास मदत मिळणार आहे. तसेच भविष्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी सोबत काम करणार आहेत. एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव चाबा यांनी म्हटले की, आम्ही कोविड १९ विरोधात लढाईसाठी पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरलो आहे. आम्ही ज्या ठिकाणी काम करतो. त्या ग्राहकांची सुरक्षितता राखणे हे आपले कर्तव्य आहे. ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यासाठी जे काही शक्य होईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू, त्यास मदत करण्यास आम्ही तयार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

आम्ही गेल्यावर्षी हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बडोदा मध्ये मॅक्स व्हेंटिलेटर प्लांट मध्ये व्हेंटिलेटर उत्पादन वाढवण्यासाठी लक्ष्य केंद्रित केले होते. आत आम्ही ऑक्सिजनवर लक्ष्य केंद्रित करीत आहोत. आज देशाला याची सर्वात मोठी गरज आहे. आम्हाला विश्वास आहे की, आपल्या सर्वांना यात यश येईल.

देवनंदन गॅसेस प्रायव्हेट लिमिटेडचे मालक विजयभाई ठक्कर यांनी म्हटले की, या मदतीसाठी आम्ही एमजीला धन्यवाद देतो. एमजी मोटर सोबत सहकार्य करून दोन्ही मिळून काम करणार आहोत. सोबत आम्ही क्षेत्रात मेडिकल ऑक्सिजनची कमी करण्यास बऱ्याच अंशी यशस्वी राहू, असा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले.

See also  देशातील 256 जिल्ह्यांमध्ये अनिवार्य गोल्ड हॉलमार्किंगचे नियम लागू