ऑक्सिजन पुरवा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची केंद्राला हात जोडून विनंती..

0

नवी दिल्लीः

राजधानी दिल्लीत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सोशल मीडियावरून केंद्र सरकारला केलेल्या आवाहनानंतर ही बाब समोर आली. दिल्लीतील काही हॉस्पिटल्समध्ये फक्त काही तासांपुरताच ऑक्सिजन उरला आहे. दिल्लीला तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करावा ही केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सोशल मीडियाद्वारे आधीच दिल्लीतील परिस्थितीबाबत माहिती दिली. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी बहुतेक हॉस्पिटल्सकडून फोन येत आहेत. पुरवठा करणाऱ्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये रोखण्यात येत आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून राज्यांमध्ये साठमारी होऊ नये यासाठी केंद्र सरकारने संवेदनशील आणि सक्रिय असणं गरजेचं आहे, असं केजरीवाल म्हणाले.

दिल्लीतील १८ हॉस्पिटलची एक यादीच उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी जाहीर केली. यापैकी ८ प्रमुख सरकारी हॉस्पिटल्स आणि १० खासगी हॉस्पिटल्सना ऑक्सिजनची गरज आहे. तिथे किती ऑक्सिजन आहे, याची माहिती त्यांनी दिली. सरकारी हॉस्पिटलपैकी आंबेडकर हॉस्पिटलमध्ये फक्त २४ तासांपुरताच ऑक्सिजन शिल्लक आहे. तर खासगी हॉस्पिटल्समधील श्रीअग्रसेन हॉस्पिटलमध्ये ४८ तास ऑक्सिजन उरला आहे. इतर हॉस्पिटल्समधील स्थिती गंभीर आहे. केंद्र सरकारला विनंती करूनही कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही, असं मनिष सिसोदिया म्हणाले.

See also  नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया सुरू