येत्या काही दिवसांत महा युद्ध होणार : रशिया लष्कर विशेषज्ञ पावेल फोलगेनहॉर

0

रशिया :

एकीकडे संपूर्ण जग हे कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलेलं असतांना सगळीकडे ताण तणावाचे वातावरण आहे. पण दुसरीकडे मात्र महायुध्द होणार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये महायुद्ध होणार असल्याचा इशारा रशियाचे लष्कर विशेषज्ञ पावेल फोलगेनहॉर यांनी दिला आहे.

रशियाच्या सैनिकांनी दारुगोळ्यासह यूक्रेन पूर्व भागातील सीमेकडे कूच केल्याच्या घटनेचा आभ्यास केल्यानंतर संपूर्ण युरोप आणि जग या महायुद्धाचे साक्षीदार ठरेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. रोझबॉल्ट आउटलेट या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पावेल फोलगेनहॉर यांनी रशियाच्या सैन्याच्या हालचालीबद्दल याआधीहि पश्चिमेकडील देशाने चिंता व्यक्त केली आहे.रशियाच्या वरोनिश,रोस्तोव्ह,क्रॅस्नोदर या प्रदेशात लष्कराच्या हालचाली दिसून आल्या आहेत.

यादरम्यान लष्करी हेलिकॉप्टर,टाक्या,गाड्या तसेच इतर लष्करी वाहणांच्या हालचाली समोर आल्या आहेत.तसेच हे युद्ध जागतिक महायुद्ध नसणार आहे.अशीसुद्धा माहिती दिली आहे.

 

See also  संयुक्त किसान मोर्चाने 26 मे रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा. प्रमुख 12 विरोधी पक्षांनचा पाठिंबा