पाषाण येथे आमदार निधीतून उभारले बस थांबे.

0

पाषाण :

कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर तसेच यांच्या पाठपुराव्यातून पाषाण सुसरोड येथे विविध ६ ठिकाणी बस स्टॉप बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. लोकांना पीएमीएमएल मध्ये प्रवास करण्यासाठी उन्हातान्हात बस स्टॉप वर बराच वेळ उभे राहावे लागते म्हणूनच नागरीकांना पीएमपीमएल बस साठी पाषाण परिसरातील विविध ६ ठिकाणी आमदार निधी मधुन बसवण्यात येत आहे. याकरिता सचिन पाषाणकर यांनी विशेष प्रयत्न केले आहे.

तसेच पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी भागासह कोथरुड मतदारसंघाच्या विविध भागातील विकास कामांसाठी चंद्रकात पाटील यांनी त्यांच्या आमदार निधी मधुन नियोजन केले आहे असेही सचिन पाषाणकर यांनी सांगितले.

यावेळी स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, संतसेवक मारुती कोकाटे,जेष्ठ नागरिक संघाचे बोखारे काका, नाना कदम,हभप बबन भेगडे, रोहिदास कोकाटे, रोहन कोकाटे, बाळासाहेब ढोरे, उत्तम जाधव, राजेंद्र पाषाणकर, प्रविण आमले, नवनाथ ववले, विराज कोकाटे, शशिकांत बालवडकर, विजय सुपेकर, प्रमोद कांबळे, सुहास पाषाणकर, शरद पाषाणकर, अभिजीत पाषाणकर, आकाश पवार, शंकर कोकाटे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  योगीराज पतसंस्थेने गरीब मुलीला संपूर्ण उच्च शिक्षणासाठी घेतले दत्तक....