राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा : छिछोरे हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट

0

मुंबई :

कोरोना व्हायरसने जगात घातलेल्या थैमानामुळे राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यंदा उशिरा करण्यात आली. या वर्षी कंगना रणौतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर मनोज वाजपेयी आणि धनुषने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला. छिछोरे हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला तर मराठमोळ्या पल्लवी जोशीला सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. द ताशकंद फाईल्स या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला.

बोर्डो या चित्रपटासाठी सावनी रविंद्रला सर्वोत्कृष्ट गायनाचा पुरस्कार मिळाला. तसेच या चित्रपटाला देखील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

पल्लवी जोशीने अनेक मराठी, हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. द ताशकंद फाईल्स मध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.

राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली असून राष्ट्रीय पुरस्काराची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे-

सर्वोत्कृष्ट चित्रपट

मर्कर लॉयन ऑफ द अरेबियन सी

सर्वोत्कृष्ट एडिटिंग

जर्से (तेलुगू)

सर्वोत्कृष्ट गायिका

सावनी रविंद्र – बार्डो

सर्वोत्कृष्ट गायक

बी प्राक

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री

पल्लवी जोशी

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता

विजय सेतुपथी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

कंगना रणौत (मनिकर्णिका, पंगा)

सर्वोत्कृष्ट अभिनेता

मनोज वाजपेयी (भोसले)

धनुष (तमीळ)

सर्वोत्कृष्ट स्पेशल मेन्शन

बिरयानी (मल्याळम)

जौनकी पोरा (आसामी)

लता भगवान करे (मराठी)

पिकासू (मराठी)

सर्वोत्कृष्ट मराठी फिल्म

बार्डो

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट

छिछोरे

सामाजिक प्रश्नांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट

आनंदी गोपाळ

राष्ट्रीय इंटर्गेशनवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट

ताजमहाल

सावनी रविंद्रने मराठीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटात देखील गायन केले आहे. तिला तिच्या गायनासाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

See also  पुणे व बेंगलोर मधील चेतक स्कूटर बुकिंग ४८ तासात बंद....