मुंबई हे जगातील दुसरे सर्वात प्रामाणिक शहर : आनंद महिंद्रा

0

आनंद महिंद्रा यांच्यासाठी सोशल मीडिया हे जीवन आहे. दररोज महिंद्रा अशी माहिती देत ​असतात, जी आपल्यासाठी खूप उपयुक्त असते. अलीकडेच त्यांनी अशीच एक माहिती शेअर केली आहे, जी सगळ्यांना आश्चर्यचकीत करेल.

एका ट्विटला रिट्विट करताना आनंद महिंद्रा म्हणाले – मुंबई हे जगातील दुसरे सर्वात प्रामाणिक शहर आहे. आनंद महिंद्रा यांची ही माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वास्तविक, रीडर्स डायजेस्ट यांना एका सामाजिक प्रयोगाद्वारे जाणून घ्यायचे होते की, जगातील कोणते शहर सर्वात प्रामाणिक आहे. तिथल्या लोकांचे विचार आणि मानसिकता काय आहे? म्हणून The Wallet Experiment च्या नावाने मोहीमेची सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत जगातील 16 प्रमुख शहरांमध्ये 192 वॉलेट मुद्दाम हरविण्यात आली. सर्व शहरांमध्ये 12 वॉलेट हरवली. या पाकिटांमध्ये सुमारे $ 50 नुसार पैसे ठेवण्यात आले होते. तसेच लोकांची नावे, कौटुंबिक माहिती, व्यवसाय कार्ड आणि पाकीटातील कार्यालयाचा पत्ता या सगळ्या माहितीचाही यात समावेश होता. हे वॉलेट हवल्यानंतर हे दिसून आले की, कोणत्या शहरातून सर्वाधिक पाकीट मिळाले. अशा स्थितीत निकाल येताच तो सर्वांसमोर प्रकाशित करण्यात आला.

दुसऱ्या क्रमांकावर मुंबई

या प्रयोगात देशाची आर्थिक राजधानी मुंबईचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आले. 12 पैकी 9 वॉलेट मुंबईत सुरक्षितरित्या परत मिळाली. त्याच वेळी, फिनलँडमधील हेलिंस्की शहर जगातील सर्वात प्रामाणिक शहर बनले. येथे 12 पैकी 11 पाकिटे सुखरुप परत मिळाली. हा मजेदार सामाजिक प्रयोग एरिक सोलहेम नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याचवेळी आनंद महिंद्रा यांनी रिट्विट करताना हे ट्विट शेअर केले.

या सामाजिक प्रयोगात अनेक वापरकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. एका वापरकर्त्याने सांगितले – जपानचे नाव या यादीत समाविष्ट नाही, अन्यथा सर्व 12 वॉलेट परत केली असती.

 

See also  मुळशी पॅटर्न' चा रिमेक 'अंतिमा : द फायनल ट्रूथ'