‘ऑस्कर सोहळा २०२१’ ची तारीख अखेर जाहीर.

0

लंडन :

संपूर्ण जग ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता आला आहे. ‘ऑस्कर पुरस्कार २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नामांकनाची घोषणा केली जाणार आहे. कोरोना महामारीमुळे या समारंभला यावर्षी विलंब झाला आहे. मात्र आता ‘ऑस्कर सोहळा २०२१’ ची तारीख अखेर जाहीर केली आहे. 25 एप्रिल 2021 रोजी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच निक जोनस आणि प्रियंका चोप्रा लंडन येथील त्याच्या घरातून ऑस्कर नामांकनाची घोषणा करणार आहेत. हा समारंभ प्रेक्षकांना घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे. प्रेक्षकांना Oscars.com च्या ग्लोबल लाईव्ह स्ट्रीम आणि Oscars.org वर हा सोहळा पाहता येणार आहे. याशिवाय हे अकादमीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब) देखील पाहता येईल.

२५ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजून१९ मिनिटांनी नामांकनाची घोषणा केली जाईल. त्याचबरोबर ही घोषणा भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनी केली जाईल. नामांकनाची दोन भागात विभागणी केली जाईल. पहिल्या भागात ९ श्रेणी असतील. यात सहाय्यक भूमिका, पोशाख डिझाइन, संगीत, अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म, लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म, आवाज, लेखन आणि पटकथा अशा श्रेणींचा समावेश आहे. तर दुसऱ्या भागाची घोषणा ही भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजता केली जाणार असून, त्यात १४ श्रेणी असणार आहेत. ज्यात मुख्य अभिनेता-अभिनेत्री, चित्रपट संपादन, सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफीसारख्या श्रेणींचा समावेश असेल.

See also  'प्रोजेक्ट ७५- इंडिया' अंतर्गत ६ पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी