बाणेर बीटवाईज सर्व्हिस रोड भूमिपूजन व सत्कार समारंभ संपन्न.

0

बाणेर :

आज बीटवाईज सर्व्हिस रोड भूमिपूजन व सत्कार समारंभ आयुष्य मान भारत योजना कार्ड वाटप भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून करण्यात आले.

यावेळी , सलग तिसऱ्यांदा स्थायी समिती अध्यक्ष पदी निवड झालेले हेमंत रासने, मंजुश्री खर्डेकर शिक्षण मंडळ अध्यक्षपदी निवड, सुमित तापकीर खेलो इंडिया विंटर गेम मध्ये सुवर्ण पदक मिळाले यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या आयुष्यमान योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्यात आले. पहिल्या टप्प्यात जवळ जवळ ३०० नागरिकांना कार्डचे वाटप करण्यात आले.

या वेळी नगरसेवक किरण दगडे, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेवक उमेश गायकवाड, सरपंच मयूर भांडे, कृष्णा बालवडकर, राहुल कोकाटे, प्रकाश बालवडकर, उमा गाडगीळ, सुनील माने , मा.उपसरपंच नारायण चांदेरे, सरपंच अपूर्वा निकाळजे, रणजित पाडाळे, उपसरपंच बेबी पाडाळे , काळूराम गायकवाड, उपसरपंच दिशा ससार, रोनक गोटे, अनिल ससार, अनिल बालवडकर, आत्माराम बालवडकर, सतीश चांदेरे, मंदार रारावीकर, प्रकाश तापकीर, संदीप तापकीर, संतोष बालवडकर, सचिन बालवडकर, माऊली बालवडकर व विवीध सोसायटी मधील चेअरमन, सेक्रेटरी, कमिटी मेंबर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक करताना नगरसेवक अमोल बालवडकर यांनी प्रभागाचा होणारा विकास सर्वांसमोर मांडला. 2017 पूर्वी असलेली परिस्थिती खुंटलेला विकास आणि 2017 नंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यावर ते सोडवलेले प्रश्नांचा  विकासनामा सर्वांसमोर मांडला, बाणेर बालेवाडी भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 24 × 7 योजना राबविली आहे. तसेच पाण्याच्या मोठ्या टाक्या बांधून पाणी प्रश्नासाठी समस्येचे निराकरण करण्यात येणार आहे. या प्रभागात विविध कामे ही केवळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही नगरसेवक करत असतो असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हटले ‘प्रामाणिक काम विकासावर ठाम’ या माध्यमातून काम करत असताना विविध प्रश्न सोडविले. तसेच विविध रस्ते सुशोभित करून प्रभाग स्मार्ट कसा होईल यासाठी सदैव प्रयत्न केले आहेत. निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो आहोत. यावेळी त्यांनी आवर्जून महापालिकेत समाविष्ट झालेली नवीन गावे सुस व म्हाळुंगे येथील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी सहकार्याची मागणी स्थायी समिती अध्यक्ष कडे केली. विरोधक कामामध्ये अडथळा निर्माण करत आहे त्यांनी तसे न करता स्वतःचा विकास दाखवावा. विकास कामे कोण करतो हे नागरिकांना चांगले माहीत असून त्याची प्रचिती येत्या निवडणुकीत नागरिक दाखवल्या शिवाय राहणार नाही. शिवाय नव्याने समाविष्ट गावातील अनेक युवक भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते म्हणून तयार होत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

See also  बाणेर-पाषाण टेकडीच्या पायथ्याशी बेकायदेशीररित्या राडारोडा टाकून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी.

त्यावेळी बोलताना स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले की, पुणे शहराला जगातील सर्वोत्कृष्ट दहा शहरांमध्ये समाविष्ट करण्याचे लक्ष ठेवून किमान पन्नास हजार कोटी ची विकास कामे मार्गी लावण्याचे लक्ष पुढील पन्नास वर्षाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने आखलेले आहे. त्यामुळे पुण्याचा विकास होणार याची खात्री त्यांनी दिली. ते म्हणाले बाणेर बालेवाडी चा गतिमान विकास अमोल  बालवडकर करीत आहे. त्यामुळे पुढच्या वेळी विकासाच्या जोरावरती ते प्रभागांमधील सर्व नगरसेवक निवडून आणतील असा विश्वास अमोल बालवडकर यांच्या प्रति व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळे हे बोलताना म्हणाले, प्रभागातील काम कसे असावे ते बाणेर बालेवाडी सारखे असावे असा आदर्श स्मार्ट काम ह्या प्रभागांमध्ये झाले. कारण त्या प्रभागात अमोल सारखे स्मार्ट नगरसेवक आहे. विरोधक त्यांच्या कामाच श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जनता हे असले फसव्या वृत्तीला बळी पडत नसून पुढच्या वेळी त्यांना त्यांची जागा दाखवून देईल अशी खात्री बाळगा. अमोल बालवडकर यांनी QRT सारखे सुंदर उपक्रम राबवले आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणी त्वरित सोडविल्या जातील असा आगळावेगळा उपक्रम राबवून पूर्ण पुणे महापालिकेत आपली एक वेगळी ओळख बालवडकर यांनी निर्माण केली आहे. असे त्यांनी आवर्जून सांगितले.