बाणेर-पाषाण टेकडीच्या पायथ्याशी बेकायदेशीररित्या राडारोडा टाकून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी.

0
slider_4552

बाणेर :

बाणेर येथील स.नं.१३,१४,१५,१६,१७ येथील डोंगराच्या पायथ्याशी बेकायदेशीररीत्या काही हितसंबंध असणारे अज्ञात इसम बाणेर – पाषाण टेकडीचे खोदाई करून पर्यावरणाचे न भरून निघणारे नुकसान करीत आहेत. या ठिकाणी सध्या भराव टाकून रस्ता तयार करण्याचे काम केले असल्याने या भराव टाकणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीचा तक्रार अर्ज पोलीस स्टेशनला पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला आहे.

सन २०१९ या वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेने व स्मार्ट सिटीने एकत्रित हा १८ मीटर रस्ता विकसित करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे रस्त्याचे काम सुरु झाले.रस्त्याचे काम करत असतांना टेकडीच्या काही भागाची कटिंग करण्यास सुरुवात झाली. हे पर्यावरणप्रेमींच्या लक्षात आले, या वेळी नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन रस्त्याचे काम थांबविले.

याची माहिती देताना गणेश कळमकर यांनी सांगितले की, २०१९ मध्ये स्मार्ट सिटी CEO, पुणे महानगरपालिका पथ विभाग व स्थानिक नगरसेवक आणि पर्यावरण प्रेमी यांच्यामध्ये बैठक झाली, या बैठकीमध्ये स्मार्ट सिटी CEO राजेंद्र जगताप उपस्थित होते.या बैठकीमध्ये सर्वांमध्ये चर्चा होऊन एकमताने टेकडी तोडायची नाही असे ठरले. १४/४ HG व कलम २१० अंतर्गत सदर रस्ता टेकडी न तोडता टेकडीच्या पायथ्याशी जी जागा मिळेल त्या जागेमध्ये ९ मीटर किंवा १२ मीटर रुंदीचा रस्ता करावयाचे ठरले होते.

त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून टेकडीवरती बेकायदेशीर भराव टाकणे, टेकडी तोडणे, अवैध खनन करणे हे काम JCB व पोकलेन च्या सहाय्याने करतांना निदर्शनास आले. अशी माहिती पर्यावरण प्रेमी दिपक श्रोत्रे यांनी दिली.

गेले काही दिवसांपासून येथे राडारोडा टाकला जात असल्याचे लक्षात आले. याला पर्यावरणप्रेमी नागरिकांनी विरोध केला व याची चौकशी केली. हे काम स्मार्ट सिटी व पुणे महानगरपालिका पथ विभाग करीत नाही असे समजले,मग हे बेकायदेशीर काम करतंय कोण ? याची चौकशी होऊन सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल
करण्यात यावा, असा तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
या राडारोडा टाकण्यामुळे येथे पाऊस झाल्यास भूसख्लन होऊन आजूबाजूच्या नागरिकांच्या जीवितास धोका संभवितो याचा विचार करून आपण त्वरित कठोर कार्यवाही करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.

See also  शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन आहेर यांचे बाणेर येथे स्वागत : शिवसेनेच्या कामाचा घेतला आढावा!

या पाहणी प्रसंगी पर्यावरण प्रेमी दिपक श्रोत्रे, वैशाली पाटकर, गणेश कलापुरे, पुष्कर कुलकर्णी, रविंद्र सिंन्हा, शैलेंद्र पटेल, महेश सांगळे, भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, पथ विभागाचे अधिकारी अजित सुर्वे आदी उपस्थित होते.