पुण्यातील लसीकरण केंद्रावर गोंधळ, पुणे प्रशासनाची तयारी नाही.

0

पुणे :

देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून (१ मार्च) सुरुवात झाली आहे. ६० वर्षावरील नागरिकांना आणि ४५ वर्षावरील दुर्घर आजाराशी सामना करणाऱ्या नागरिकांना या टप्प्यात लस देण्यात येत आहे. मात्र या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या पहिल्या दिवशी पुण्यामध्ये गोंधळ यला मिळाला. अनेक नागरिकांनी कोरोना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली. मात्र यंत्रणा सज्ज नसल्याने लसीकरण व लसीकरणासाठी नाव नोंदणी होणार नसल्याचे पुणे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. यामुळे अनेक केंद्रावर पालिका अधिकारी आणि नागरिकांमध्ये वादावाद झाल्याचे प्रसंग घडले. याचदरम्यान पुण्यात प्रत्यक्ष लसीकरणाला ८ मार्चपासून सुरुवात होण्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यामुळे लस घेण्यासाठी आलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. पुण्यातील चारही लसीकरण केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली. नाव नोंदणीसाठी, व प्रत्यक्ष लस घेण्यासाठी मोठ्याप्रमाणावर पुणेकर लसीकरण केंद्रावर आले होते. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळ पहायला मिळाला. मात्र राज्य सरकारकडून सुचना येण्याच्या बाकी असल्याने पुणे प्रशासनाकडूनही तयारी झाली नव्हती. त्यामुळे लसीकरण केंद्रावर जमलेल्य़ा नागरिकांना घरी पाठवण्याची वेळ आली. परंतु केंद्राने तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला आजपासून सुरुवात होते असे जाहीर केले असताना तुम्ही आम्हाला घरी पाठवू शकत नाही असे म्हणत नागरिकांना अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच लसीकरणाऱ्या नाव नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने नाव नोंदणी करायच्या आधीच लॉगिनमध्य़े अडचणी सुरु झाल्या त्यामुळे नागरिकांच्या रोषाबरोबरच तांत्रिक अडचणींचाही सामना प्रशासनाला करावा लागला.

See also  उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रांनी एकत्रित येऊन रोजगार निर्मिती करावी : सुभाष देसाई