योगीराज पतसंस्थेचा कृष्णानगर शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0

कृष्णानगर  :

योगीराज पतसंस्थेचा कृष्णानगर शाखेचा 21 वा वर्धापन दिन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती मिळाल्या बद्दल नंदकुमार पिंजन व महाराष्ट्र शासनाच्या कृषी भुषण पुरस्काराने सन्मानित ज्ञानेश्वर बोडके यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच उदयोन्मुख गिर्यारोहक चेलवी ढोकळे हिचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी केले. संस्थेने आर्थिक क्षेत्रात केलेल्या प्रगतिचा आलेख सादर केला. संस्थेने यावर्षी कोरोना महामारीच्या काळात सुद्धा 2 कोटी 27 लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. तसेच त्यांनी संस्था करत असलेल्या सामाजिक कामाचा लेखाजोखा मांडला. योगीराज पतसंस्थेच्या स्थापनेला 25 वर्ष पुर्ण झाल्याने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 15 वे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन आयोजित केले आहे अशी माहिती दिली.

योगीराज पतसंस्थेत आल्यानंतर जुने दिवस आठवले व संस्थेने माझा केलेला सन्मान माझ्या घरातील  आहे व तो मला प्रेरणादायी आहे असे मत नंदकुमार पिंजन  यांनी व्यक्त केले. तसेच संस्था करत असलेल्या आर्थिक प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी ज्ञानेश्वर बोडके यांनी संस्था गरीबांना करत असलेल्या कर्जरुपी मदती बद्दल विशेष कौतुक केले व  समाजाभिमुख कार्याबद्दलही समाधान व्यक्त केले. तसेच उपस्थितांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून दिले व चांगल्या आरोग्यासाठी सेंद्रीय पद्धतीने पिकवलेले धान्य व फळ भाज्या खाण्याबद्दल आव्हान केले.

याप्रसंगी नगरसेविका स्विनलताई म्हेत्रे, पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष राजाभाऊ जोरी, पुरंदर पंचायत समिती चे मा.सभापती तथा विद्यमान सदस्य रमेश जाधव, बबनराव चाकणकर, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रविंद्र घाटे, एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकळे, हॉटेल व्यवसायिक रामदास मुरकुटे,  म्हातोबा शिक्षण संस्थेचे गणपतराव बालवडकर, पंचायत समितीचे माजी सदस्य अशोकराव मुरकुटे, हनुमान देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष हनुमंत म्हेत्रे, बाणेर चे मा.सरपंच लक्ष्मण सायकर, उद्योजक भगवान पठारे, शिवराज सिरसगे, ह.भ.प. संजयबापू  बालवडकर, सनदी लेखापाल चंद्रकांत कासट, श्रीराम समर्थ पतसंंस्थेचे संस्थापक दत्तात्रय तापकीर, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मुरकुटे, चेअरमन विजय विधाते, माजी चेअरमन रामदास विधाते, प्रल्हाद मुरकुटे, दत्तात्रय तरटे,वसंतराव देशमुख, युवा नेते कपिल कुंजीर शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, खातेदार, सर्व संचालक व स्टाफ उपस्थित होते.

See also  'अश्वगंधा' वनस्पतीची कोव्हिड लसीकरणानंतरची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी संशोधनात सामान्य नागरिकांना सहभागाची संधी

आलेल्या सर्वांचे स्वागत संस्थेचे शाखाध्यक्ष शंकरराव सायकर यांनी केले तर आभार संचालक अनिल खैरे यांनी मानले.