बालेवाडी : शेतकरी विरोधी तीनही कृषी कायदे रद्द करावेत, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालास दीडपट हमीभाव मिळावा आणि कोरोना काळातील वाढीव वीज बिल माफ करावे या मागणीसाठी स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बालेवाडी फाटा येथे शनिवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले.
स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.यावेळी हनुमंत बालवडकर, अमित कुदळे, सोमनाथ शिंदे, देविदास ववले, सोपान खाणेकर, दिलीप बालवडकर, नरेंद्र बालवडकर, ऋषीकेश शिंदे आदींसह अन्य शेतकरी उपस्थित होते.