मुंबई :
महाविकास आघाडीतील तणाव निवळला असल्याची माहिती समोर येत आहे. कॉँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्मुला जवळपास निश्चित झाला असल्याची माहितीही समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील बहुतांश जागांवर शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. कोण किती जागा लढवणार याबाबत फॉम्यूला ठरला असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार, कॉँग्रेसला -103 ते 108 जागा, शिवसेना ठाकरे गट 90 ते 95 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 80 ते 85 जागा देण्यात येणार असून मीत्र पक्षांसाठीही जागा सोडण्यात येणार आहेत. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसाठी 3 ते 6 जागा सोडण्यात आल्याचे समजते. जागावाटपाचा हा फॉ्म्युला जवळपास निश्नित झाला आहे असे सांगितले जात आहे.
महाविकास आघाडीतील वाद निवळला –
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरांत यांच्या मध्यस्तीनंतर महाविकास आघाडीत मुंबई आणि विदर्भावरुन सुरू असलेला वाद अखेर निवळला आहे. मुंबईत ठाकरेंची शिवेसनाच मोठा भाऊ असणार आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे युबीटी पक्षाला 18 जागा तर, कॉग्रेस 14 जागांवर निवडणूक लढेल. त्यापैकी 11 जागांवर शिक्कामोर्तब तर 2 जागांवर चर्चा सुरूआहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाला मुंबईत केवळ 2 जागा -सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत केवळ 2 जागा मिळणार आहेत. अणुशक्ती नगर आणि घाटकोपर शिक्कामोर्तब होण्याची शव्यता आहे. तर, समाजवादी पार्टी- 1(शिवाजी नगर) आणि आम आदमी पक्ष 1 जागा सुटणार असल्याचा मुंबईतील फॉर्मुला निश्नित झाल्याचे समजते. दरम्यान, मुंबईतील वसोवा,भायखळा आणि वांद्रे पुर्व या तीन जागांवर ठाकरे गट आणि कांग्रेसमध्ये तोडगा निघेल.
आजपासून निवडणूक अर्ज भरायला सुरुवात –
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 सार्ठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर 4 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला सर्व 288 जागांसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत.