पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनलचे होणार आधुनिकीकरण..

0

पुणे :

पुणे विमानतळावरील प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर करण्यासाठी जुन्या टर्मिनल इमारतीचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) दिली आहे.

नुकतेच (14 जुलै 2024) पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल प्रवाशांसाठी खुले करण्यात आले. पुणे विमानतळावरील कामाचा पुढचा टप्पा म्हणून जुन्या टर्मिनल इमारतीचा विस्तार आणि आधुनिकीकरण केले जाणार आहे. 25 कोटी रुपये खर्च करून चार हजार चौरस फूट क्षेत्रात हे काम केले जाणार आहे.

जुन्या टर्मिनलच्या आधुनिकीकरणाच्या कामाला ऑक्टोबर 2024 मध्ये सुरुवात होणार आहे. यामध्ये आगमन हॉल कॉरिडोरद्वारे नवीन टर्मिनलशी जोडला जाणार आहे. यामुळे दोन्ही टर्मिनलचा एकत्रित प्रशस्त आगमन हॉल तयार होईल. 16 आणखी चेक इन काऊंटर असतील. यामुळे प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होऊन चेक इन प्रक्रिया जलद होईल.

अत्याधुनिक डोअर फ्रेम, मेटल डिटेक्टर असेल. ज्यामुळे सुरक्षेला आणखी बळकटी येईल. त्यासह एक्सरे मशीन, एक सुरक्षा तपासणी क्षेत्र देखील यामध्ये सुरु केले जाणार आहे. हे काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होऊन जुने टर्मिनल नव्याने प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे

https://x.com/AAI_Official/status/1828698787885314343

See also  शाळा सुरु होण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहचवण्याचे नियोजन.