बाणेर श्री विठ्ठल रुक्मिणी देवता वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार..

0

बाणेर :

बाणेर श्री विठ्ठल रुक्मिणी देवता वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह अतिशय आनंदात पार पडला. भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवलाल धनकुडे. यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 24 वर्ष चालत आलेली सेवा यावर्षी उत्साहात पार पाडण्यात आली.

सप्ताह मध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे प्रसिद्ध महाराज यांचे किर्तन सेवा आयोजित केली होती. आजचे किर्तन सेवा बढे महाराज आळंदी यांचे अतिशय सुंदर असे किर्तन झाले. या उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आदर्श माता हा पुरस्कार देऊन महिलांना गौरविण्यात आले.

आदर्श माता पुरस्कार :

1.सौ.अरूणाताई गायकवाड                                2.श्रीमती शकुंतलाताई जगदाळे.                        3.श्रीमती प्रमिलाताई पुंडलिक मुरकुटे.                           4 सौ. प्रमिलाताई दिलीप बालवडकर.                  5.श्रीमती जयश्रीताई शरद जाधव .

यांना आदर्श माता पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
अशा प्रकारे समाज उपयोगी कार्यक्रम करून आनंद मिळतो व समाधान मिळते अशी भावना शिवलाल धनकुडे यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रम प्रसंगी आवर्जून उपस्थित नीलप्रसाद चव्हाण (उपजिल्हाधिकारी तथा जमावबंदी अधिकारी पुणे),
अंकुर कावळे (कार्यकारी अभियंता एम एस बी पुणे), प्रमोदजी भोसले(सिनीअर ऑडिटर महाराष्ट्र परिवहन महामंडळ), ॲड दिलीपजी शेलार, ॲड. संग्रामजी कोल्हटकर, ॲड.निखिलदादा गायकवाड, प्रकाश पवार माजी सभापती वेल्हा, सिद्धार्थ रणवरे माजी सरपंच,  जगन्नाथ नाटक पाटील, आप्पा रेणुसे, मोहनशेठ जगदाळे,  शामराव जगदाळे, महादेव मारणे, मोहनशेठ घोलप, तानाजी वाडकर, संजय बापू बालवडकर, सुखदेव चौधरी (चेअरमन अमृतेश्वर सोसायटी), चंद्रकांतआण्णा मरगळे,  पै.दत्तामामा शिंदे, प्रकाश भाऊ गायकवाड, लहुशेठ भोरेकर,  सचिनशेठ वाडकर, आयुष तारी, स्वप्नील बांडे,  नामदेव चौधरी(उपाध्यक्ष रा.मुळशी), परकाळे गुरुजी, राजेंद्र महराज पातळे, समीर तरवडे सरपंच गराडे, बंटी जगदाळे डॉ.रमेश पांगारे,  राजेश साबळे, अविनाश जगदाळे आदी उपस्थित होते.

See also  जगात पाचवी अर्थव्यवस्था आपण झालो आहोत, त्यातून रोजगार, गरीब कल्याण, मजबूत देश तयार होत आहे, ते केवळ मोदींमुळेच : देवेंद्र फडणवीस

या कार्यक्रमाचे संयोजक हनुमंत मुरकुटे, संजय नाना मुरकुटे, जयेश मुरकुटे यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन विराज धनकुडे आणि राहुल धनकुडे यांनी केले होते. संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा (नानी) धनकुडे, सीईओ सुषमा भोसले, मुख्याध्यापिका रेखा काळे, मुख्याध्यापिका कोमल शिंदे (ज्युनिअर कॉलेज), मुख्याध्यापिका करुणा यादव (सुस ब्रांच), माधुरी शेवाळे (प्री स्कूल ) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  शंकर चंद्रकांत मरगळे याने केला.