शेतकरी आंदोलनातील हिंसाचार प्रकरणी २६ शेतकरी नेत्यांविरोधात एफआयआर दाखल.

0

नवी दिल्ली :

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी २६ शेतकरी नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शेतकरी नेते राकेश टीकैत, मेधा पाटकर, स्वराज इडियाचे योगेंद्र यादव यांचीही नावं आहेत. दरोड्याचं षड्यंत्र, हत्यारांचा वापर आणि हत्येचा प्रयत्न अशी गंभीर १३ कलमं दाखल करण्यात आली आहेत. दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये अनेक शेतकरी नेत्यांची नावे समाविष्ट आहेत. या नेत्यांमध्ये राकेश टीकैत, मेधा पाटकर , स्वराज इडियाचे योगेंद्र यादव यांच्यासह दर्शन पाल, राजिंदरसिंग, बलबीरसिंग राजेवाल, बूटासिंग बुर्जगिल आणि जोगिंदरसिंग उगरा यांची देखील नावं आहेत.

प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागलं. या हिंसाचाराप्रकरणी शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २६ शेतकरी नेत्यांविरोधात विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ९३ हून अधिक जणांना अटक केल्याचं बोललं जात आहे. तर २०० लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला जात आहे की पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी जारी केलेल्या एनओसीचे पालन केलं गेलं नाही.

गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांची नावं

आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास सर्व नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जे नेते आंदोलनाचा चेहरा होते, आंदोलनाचं नेतृत्त्व करत होते त्या सर्व नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव, जममुरी किसान सभा पंजाबचे कुलवंतसिंग संधू, भारतीय किसान सभा डकोडाचे बुटा सिंग यांचा समावेश आहे. कवणलप्रीतसिंग पन्नू, किसान मजदूर संघर्ष समिती सतनामसिंह पन्नू, सुरजितसिंग फूल, जोगिंदरसिंग हरमीतसिंग कादियन, बलवीरसिंग राजेवाल, सतनामसिंग साहनी, डॉ. दर्शन पाल, भगबसिंग मनसा बलविंदर लिओ ओलाक, सतनामसिंग भेरू, बुटासिंग शादिपुर, बलदेवसिंग सिरसा, जगबीरसिंग ताडा, मुकेश चंद्र, सुखपालसिंग दाफर, हरपाल सांगा, कृपालसिंग नटूवाला, राकेश टिकैत, कविता, ऋषी पाल अंबावता, व्हीएम सिंग, प्रेमसिंग गहलोत यांची नावं एफआयआरमध्ये आहेत

See also  अपोलो हॉस्पिटलमध्ये स्पुटनिक-व्हीच्या एका डोससाठी 1250 रुपये मोजावे लागणार