पवना धरणात 24 टक्के पाणीसाठा, कधीपर्यंत पुरेल पाणी?

0

पिंपरी चिंचवड :

पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात आजच्या तारखेला 24.52 टक्के तर आंद्रा धरणात 29.85 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा 15 जुलै पर्यंत पुरेल एवढा आहे.

शहरासाठी महापालिका पवना धरणातून दररोज 520 एमएलडी पाणी घेते. हे पाणी पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जलउपसा केंद्रात उचलले जाते. तेथून ते निगडी येथील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून ते संपूर्ण शहरात पुरविले जाते.

गेल्या काही दिवसापांसून आंद्रातून होणारा अपुरा पाणी पुरवठा आता सुरळीत झाला असून महापालिका 80 एमएलडी पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील बंधाऱ्यातून उचलते. हे पाणी चिखली जलशुद्धीकरण आणले जाते. तेथे पाणी शुद्ध करून चिखली, मोशी, च-होली, भोसरी परिसरातील नागरिकांना दिले जात आहे. एमआयडीसीकडून महापालिका सध्या 15 एमएलडी पाणी असे एकूण 615 एमएलडी पाणी शहराला दिले जात आहे.

पवना धरणात आजच्या तारखेला 24.52 टक्के पाणीसाठा असून हा 15 जुलै पर्यंत पुरेल एवढा आहे. परंतु, गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर, आंद्रा धरणात 29.85 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा 15 जुलैपर्यंत पुरेल. त्यामुळे पाण्याची चिंता नाही. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.

See also  औंध-रावेत मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार…