राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तपदी अनिल कवडे यांची नियुक्ती

0

पुणे :

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तपदी अनिल कवडे यांची नियुक्ती झाली आहे. सहकार व पणन विभागाचे वरिष्ठ मुख्य सचिव अनुपकुमार यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

यावेळी माजी सहकारी प्राधिकरण निवडणूक आयुक्त जगदीश पाटील, साखर आयुक्त डॉ.कुणाल खेमनार, सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे, सहकारी निवडणूक प्राधिकारणाचे सचिव अशोक गाडे, सहकार व पणन विभागाचे सह सचिव संतोष पाटील, अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था श्रीकृष्ण वाडेकर आणि सहकारी निवडणूक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

See also  प्रत्येक प्रभाग कार्यालयात मतदान केंद्राची माहिती देण्याची व्यवस्था करा – जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे