टँकरचालकाने दुचाकी चालकाला नेले 25 फूट फरफटत, दुचाकीस्वाराचा मृत्यू

0

सुस :

गुरुवार दि.2 मे रोजी शिवबा चौक,सुसगाव येथे एका टँकरचालकाने निष्काळजीपणाने टँकर चालवत दुचाकीला पाठीमागून धडक दिली.या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी समृध्द संजय कानेकर (वय 30 रा. सूसगाव,मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून टँकरचालक नागनाथ विलास अर्जुन याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातात सुरेश नारायण बिलवडे यांचा मृत्यू झाला आहे.

बिलवडे यांना तसेच फरफटत 25 फूट नेले. दुर्दैवाने या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. टँकरचालकाने टँकर तसाच पुढे चालवत एका रिक्षाला देखील धडक दिली.सुदैवाने रिक्षाचालक मनोज विलास राठोड यांना गंभीर इजा झाली नाही. हा अपघात एवढा भीषण होऊन देखील टँकरचालक कशाचीही पर्वा न करता घटनास्थळाहून पसार झाला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

याबाबत परिसरातील नागरिकांनी मात्र टँकर ची तपासणी व चालकांची तपासणी करण्याची मागणी केली आहे अनेक टँकर चालकांकडून लायसन नसून टँकरची दुरावस्था झालेली पाहावयास मिळते. यामुळे पाषाण, सुस, बाणेर, बालेवाडी, माळुंगे परिसरातील टँकरची तपासणी करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.

See also  समाविष्ट सुस-म्हाळुंगे गावांना पायाभूत सुविधा देण्यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर  प्रयत्नशील.