बाणेर परिसरात महिला दिनानिमित्त मोफत कॉम्पुटर क्लास ची सोय….

0

बाणेर :

महिला दिनानिमित्त बाणेर येथील भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोथरुड उत्तर उपाध्यक्ष यश संदीप ताम्हाणे यांच्या वतीने परिसरातील आठ गरजवंत महिलांना मोफत कॉम्प्युटर कोर्सचे सोय करून देण्यात आली. ८ मार्च महिला दिनानिमित्त परिसरातील आठ महिलांना कॉम्प्युटर कोर्सची मोफत सुविधा त्यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली.

बाणेर परिसरामध्ये अनेक गरजवंत महिलांना क्लासची फी नसल्यामुळे कॉम्प्युटर शिकता येत नाही. त्या मुळे त्यांना त्यापासून वंचित राहावे लागते. कॉम्पुटर शिक्षण ही काळाची गरज झाली आहे. तसेच कॉम्पुटर कोर्सेस केल्या मुळे अनेक नोकरी च्या संधी देखील मिळतात त्यामुळे त्यांना आपल्या स्वतः आर्थिक बाबतीत स्वावलंबी महिलांना होता यावे, त्यामुळे मोफत कोर्स महिलांना उपलब्ध करून दिला असल्याचे यश ताम्हाणे यांनी सांगितले.

See also  दोन जीव वाचविणा-या मारुती बनकर यांना योगीराज पतसंस्थेची आर्थिक मदत...