औंध :
बाणेर येथील मारुती बनकर यांच्या शेजारच्या घरात तापत ठेवलेल्या तेलाचा भडका उडाला. त्या घरात अडकलेल्या आई व मुलगी यांना बनकर यांनी सुखरुप घराबाहेर काढले तसेच आगीमुळे गैस ससिलेंडरचा स्फोट होवू नये म्हणून 2 सिलेंडर बाहेर काढले. नंतर आग विझवण्यासाठी पाणी टाकले असता त्याचा मोठा भडका उडाला व त्यात बनकर गंभीररित्या भाजले. स्वत:चा जीव धोक्यात घालून बनकर यांनी दोन जीव वाचवले.
परंतू त्यांची परिस्थिती बिकट आहे त्यामुळे हॉस्पिटलचे होणारे बिल भरणे जमत नही ही व्यथा त्यांच्या पत्नी सारिका बनकर यांनी योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांच्याकडे मांडली.अशा परिस्थितीत योगीराज पतसंस्थेने त्यांच्या पत्नी यांना पतसंस्थेतर्फे 11 हजार रुपये मदत तात्काळ दिली.
या प्रसंगी बोलताना योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, आजच्या या कठीण प्रसंगी दुसऱ्यासाठी जीव धोक्यात घालवण्याचे धाडस मारूती बनकर यांनी दाखविले. अशा या धाडसी कर्तुत्वाला सलाम करुन ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा कठीण प्रसंगी मारुतीला मदत करावी असे आव्हान तापकीर यांनी सर्वांना केले. तसेच अधिकची मदत मिळवून देण्यासाठी नियोजन करुन लवकरच ती मारुतीला दिली जाईल असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी पतसंस्थेचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, संचालक वसंत माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे व सर्व स्टाफ उपस्थित होते.