जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा रद्द,भाविकांना तीन दिवस जेजुरीत प्रवेश नाही…..

0

पुणे : सासवड प्रतिनिधी

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली असून, शनिवार ते सोमवार असे तीन दिवस भाविकांना जेजुरीत प्रवेश दिला जाणार नाही अशी, माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे.

जेजुरी येथील खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खंडोबा देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोमवती यात्रा रद्द करण्यात आली असून पालखी सोहळ्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये तीन दिवस जेजुरीत येणे टाळावे. येथील व्यावसायिकांनी भाविकांना आपल्याकडे उतरून घेऊ नये. तीन दिवस खंडोबा गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत. मंगळवार नंतर पुन्हा खंडोबा गडावर भाविक जाऊ शकतील असे पोलीस निरीक्षक महाडीक यांनी स्पष्ट केले.तर विश्वस्त संदीप जगताप यांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी विश्वस्त मंडळ करेल, कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी शासनाला आपण सहकार्य करावे, भाविकांनी तीन दिवस जेजुरीत येणे टाळावे, असे आवाहन केले आहे. तसेच, मंगळवारी खंडोबा गडावर चंपाषष्टी उत्सव ( देव दीपावली ) सुरू होत आहे. या पाच दिवसाच्या काळात ग्रामस्थांना व भाविकांना नेहमीप्रमाणे मुखदर्शनाची सोय केलेली आहे. चंपाषष्ठीला सर्व ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या पूजा प्रथेप्रमाणे केल्या जातील. दर्शन मंडपामध्ये पुजारी सेवक अन्नदान मंडळातर्फे पाच दिवस दररोज अन्नदान केले जाणार आहे.

See also  पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीने देशात चौथे स्थान पटकावले आहे. तर पुणे स्मार्ट सिटीचा पाचवा क्रमांक आला आहे.