पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसंबंधीच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

0

मुंबई :

पुणे लोकसभा मतदार संघात भाजपचे गिरीश बापट यांच्या निधनानंतर 9 महिन्यांपासून पुणे मतदारसंघाची जागा रिक्त आहे. महिनाभरापुर्वी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. पोटनिवडणूक घेण्याच्या या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे.

पुणे लोकसभा पोट निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. या आदेशाला निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावरच आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पुणे लोकसभा निवडणूक घेण्यावर स्थगिती दिली आहे.

सार्वत्रिक निवडणुकीला थोडाच वेळ बाकी आहे, त्यामुळे पोटनिवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी सात आठवड्यांनी होणार आहे. पोटनिवडणुकांबाबत कायद्याची स्पष्टता करू असेही निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

See also  शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार